shengole recipe- झणझणीत, चमचमीत, स्वादिष्ट, गावरानी पदार्थ फोडणीच्या वरणातील गव्हाच्या पीठाचे उकड शेंगोळे :-

#shengole recipe in marathi,

#marathi recipe

#shengole marathi recipe

#shengole recipe

दररोजच्या जेवणाचा कंटाळा आला की काहीतरी खावेसे वाटते तेव्हा सोपी रेसिपी म्हणजे फोडणीच्या वरणातील गव्हाच्या पीठाचे उकड शेंगोळे. हा गावरान पदार्थ  लहानापासून मोठ्या लोकांचा सर्वांच्या आवडीचा  आहे. 

साहित्य :-

२५० ग्राम  गव्हाचे पीठ

1 मोठी वाटी शिजलेले पातळ वरण 

१ कांदा बारीक चिरून

१ लसुन बारीक चिरून

२ छोटे चमचे तिखट

१ छोटा चमचा हळद

१ छोटा चमचा हिंग 

१ छोटा चमचा जीरे 

अर्धा छोटा चमचा मोहरी  

२ डाव तेल 

कोथिंबीर बारीक चीरलेली  

१ छोटा चमचा गरम मसाला 

पानी आवश्यकतेनुसार 

मीठ चवीनुसार 

कृती :-

स्टेप १ - प्रथम गव्हाचे पीठ एका परातीत घ्या .त्या मध्ये चिमूटभर हिंग, तिखट ,हळद ,मीठ, थोडी कोथिंबीर ,सर्व मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या.

स्टेप २ - एक छोटासा गोळा घेऊन हातावर गोल लांबोळी पुंगळी  बनवा.दोन्ही टोक एकमेकांना जोडा.अशाप्रकारे सर्व पिठाचे शेंगोळे करा.

स्टेप ३ - कढईत तेल गरम करून त्यात ,मोहरी जीरे तडतडू  द्या त्यानंतर त्यात कांदा, लसूण टाकून लालसर परतून घाला घ्या.तिखट,हळद मीठ घालून शिजलेले पातळ वरण व २ग्लास पाणी टाका. पाण्याला उकळी आली कि शेंगोळे सोडा.गरम मसाला टाका . 



स्टेप ४ - 5 मिनिट उकळू द्या मग झाकण ठेवून 25 मिनिट शिजू द्या .वर तरंगले कि समजायचं शेंगोळे शिजले.छान कोथींबीर घालून आंब्याच्या किंवा  लिंबाच्या लोणच्यासोबत गरमागरम shengole सर्व करा.




Post a Comment

0 Comments