solapuri special shengdana amti-:

 सोलापुरी स्पेशल शेंगदाणा, लसणाची झणझणीत आमटी :


# special shengdana amti

# solapuri shengdana amti

#पौष्टिकआहाररेसिपी

#आमटी

#सोलापुरीस्पेशलशेंगदाणालसणाचीझणझणीतआमटी

साहित्य :

१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे

४ ते ५ हिरव्या मिरच्या

१ टेबलस्पून जीरे

35 ग्राम कोथिंबीर

फोडणीसाठी

१ टीस्पून जीरे

१ टीस्पून मोहरी

१ टीस्पून हिंग

१ टीस्पून तिखट

१ टीस्पून हळद

१ टीस्पून गरम मसाला

 आवश्यक्यतेनुसार पाणी

कृती:

स्टेप १: प्रथम भाजलेले शेंगदाणे बारीक फिरवून घ्यावे. मिस्करमध्ये फिरवून घ्यावे.नंतर लसूण,कोथिंबीर, जिरे मिक्सरमध्ये बारीक करणे.



स्टेप २: कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जिऱ्याची फोडणी करावी आणि त्यात हिंग, लसूण कोथिंबीरीचे वाटण टाकून परतून घ्या. त्यामध्ये मिक्सरमधे बारीक फिरवलेलं शेंगदाण्याचे कूट, हळद, गरम मसाला ,मीठ तिखट घालून परतून घ्या.



स्टेप ३: १० सेकंदाने त्यात गरजेनुसार पाणी घालावे. थोडावेळ उकळावे.आमटीला घट्टपणा कसा हवाय त्यानुसार उकळावे. 


स्टेप ४: तयार झाली सोलापुरी स्पेशल शेंगदाणा, लसणाची झणझणीत आमटी. आमटीत वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाता बरोबर किंवा पोळी सोबत गरमागरम सर्व्ह करावी.





Post a Comment

0 Comments