घरगुती स्वादिष्ट,स्वास्थ्यवर्धक पिज्ज़ा टोमॅटो सॉस :

#पौष्टिकआहाररेसिपी

#पिज्ज़ाटोमॅटोसॉस

#टोमॅटो

#घरगुतीस्वादिष्टस्वास्थ्यवर्धकपिज्ज़ाटोमॅटो सॉस


घरी बनलेला पिज़्ज़ा सॉस रेसिपी घरी बनविल्या जाणाऱ्या पिज्ज़ासाठी ताजा आणि स्वादिष्ट आणि सोपी , झटपट होणारी रेसिपी आहे.

हे रेसिपी घरी बनविली आहे म्हणून हा सॉस शुध्द आहे. ह्यात हानिकारक प्रिसर्वेटिव्स नाहीत.

तर चला आज बनवुयात फ्रेश टोमॅटो पासून घरगुती स्वादिष्ट ,स्वास्थ्यवर्धक पिज्ज़ा सॉस.

साहित्य:

२ कप टोमॅटो प्युरी

२ टीस्पून तेल

१ टीस्पून मीठ

 ½ कप टोमॅटो कॅचअप

२ टीस्पून तिखट,                                                       

६ लसूण पाकळ्या बारीक कापून,

१ टीस्पूनगरम मसाला- 2 चमचे, 

१कांदा बारीक चिरलेला 

कृती: 

स्टेप १ - प्रथम टोमॅटो कापून मिक्सर मध्ये त्याची प्युरी करा.


स्टेप २ - पॅनमध्ये २ चमचे तेल  टाका. नंतर लसणाच्या पाकळ्या परतून घ्या. कांदे घालून परता. आता टोमॅटो प्युरी घालून चालवा.

 


स्टेप ३ - टोमॅटोचा पाणी शोषून गेल्यावर मीठ आणि तिखट मिसळा. गरम मसाला घालून केचअप टाका. ३-४ मिनिटे चालवत राहा नंतर गॅस बंद करून द्या. 






 स्टेप ४ - तयार आहे आपला घरगुती स्वादिष्ट ,स्वास्थ्यवर्धक पिज्ज़ा टोमॅटो सॉस.ह्या सॉसचा उपयोग ब्रेड पिज़्ज़ा,पास्ता अजून कितीतरी रेसिपी बनविण्यासाठी करतात.




Post a Comment

0 Comments