Paushtik Kartule chi bhaji in marathi-

पौष्टिक, शक्तीदायी ,आरोग्यदायी हांडी कर्टुले (रानभाजी) +चना डाळ भाजी :-


# paushtik kartule chi bhaji

# kartule chi bhaji in marathi

आज आपण कर्टोली भाजीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्यामध्ये भरभरुन पोषणमूल्ये असतात. या भाजीला काही लोक जगातील सगळ्यात जास्त शक्तिदायी भाजी मानतात. अशा या जगातील सर्वात जास्त शक्तीदायी भाजी चे नाव आहे. 

पावसाळ्यातील रानभाजी पैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. करटोली या भाजीचे उत्पादन डोंगराळ भागात घेतले जाते. या भाजीचा वेल असतो व या वेलीवर कारल्याशी साम्य असणारी छोटी फळे निर्माण होतात. या फळापासूनच करटोलीची भाजी बनवली जाते. करटोलीच्या भाजीच्या सेवनामुळे अनेक आजारांना दूर केले जाऊ शकते. 

करटोली या भाजीमध्ये आरोग्यासाठी हितकारक असे अनेक गुणधर्म असतात. करटोली या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराचे बलवर्धन होते.

करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात  तर कॅलरीज अत्यल्प असतात. 

करटोलीमध्ये फायबर आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. 

पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. 

शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील phytochemicals घटक मदत करतात. 

वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

करटोलीवरील आवरण काढू नका. त्यामध्ये अधिक पोषकघटक आहेत. 

तर चला चण्याची डाळ घालून   पौष्टिक करटोली भाजी करूयात. 

साहित्य :

२५० ग्रॅम कर्टूले

२ उभे चिरलेले कांदे

१ टोमॅटो बारीक चिरलेला

१ १/२टीस्पून जिरे लसुण पेस्ट

२ हिरव्या मिरच्या बारीक  चिरलेल्या

२५ ग्रॅम भिजवलेली हरभरा  डाळ

१ १/२टीस्पून लाल तिखट

१ टीस्पून धणे पुड

१ टीस्पून मीठ

१/२ टीस्पून हिंग

१टीस्पून हळद

१ टीस्पून मोहरी 

२ टेबलस्पून तेल

कृती :

स्टेप १: बाजारातून ताजी हिरवीगार करटोली विकत घ्या. कारल्याप्रमाणे करटोली देखील चकत्यांमध्ये किंवा उभे कापा. प्रथम एका हंडीत किंवा कढईत तेल गरम करा त्यात मोहरी, जीरे तडतडू द्या.




स्टेप २: नंतर त्यात  कांदा, वाटलेले  लसुन  जीरे, टॉमेटोच्या फोडणीवर करटोली  परतून वाफवा. यामध्ये  आवडीनुसार हळद, मसाला, धने-जिर्‍याची पूड, मीठ आणि भिजविलेली चना डाळ  टाकून परतून घ्या. त्यानंतर कापलेले कर्टूले मिसळून भाजी  परता . थोडे आवश्यकतेनुसार  पाणी घाला. कर्टुले शिजले की गैस बंद करा. भाजीवर कोथिंबीर घालून मिसळून घ्या.










पौष्टिक,शक्तीदायी ,आरोग्य दायी हांडी कर्टुले(रानभाजी) पोळीसोबत खा.



Post a Comment

0 Comments