Vangyachi ani solane chi bhaji-
सोलाने (हरभऱ्याचे ओले दाणे) आणि वांग्याची मिक्स झणझणीत ,चमचमीत भाजी :
# vangyachi ani solane chi bhaji
# vangyachi bhaji in marathi
हिवाळ्यात हिरवे हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर ताजे हिरवे हरभऱ्याचे दाणे (सोले) शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर काही औरच आहे.
जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेला हिरवा हरभरा ही हिवाळ्यातील अ जीवनसत्त्वे अ आणि क जीवनसत्त्वांचा सर्वात चांगला स्रोत आहे. यात असलेले अँटीऑक्सिडंट शरीरातील रोग प्रतिकारशक्तीची क्षमता वाढवते. हे संसर्ग आणि सर्दीच्या सामान्य आजारांपासून संरक्षण करते. हे त्वचेसाठीही खूप चांगले आहे.
हिवाळा हंगामी भाजीपाल्याचा खजिना घेऊन येतो. हिवाळ्यात येणाऱ्या बर्याच भाज्या केवळ चवच नव्हे तर आरोग्याच्या बाबतीतही अतिशय उपयुक्त असतात.
या सर्वांमध्ये अशी एक भाजी आहे ज्यामध्ये चव आणि आरोग्यासाठी बरेच फायदे सुद्धा आहेत. ती भाजी म्हणजे हिरवा हरभरा. मग ते कच्चे खावं, भाज्या किंवा उकडून बनवून खावं.
वांग्यातही आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि ते खाण्याचे इतर बरेच फायदे आहेत. वांगं हे कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही.
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, वाग्यांच्या भाजीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात आणि ते केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच नव्हे तर आपल्या शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कमतरता दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. वांगी कोणत्याही स्वरूपात खाणे फायद्याचे असते. तर आज आपण बनवुयात सोलाने (हरभऱ्याचे ओले दाणे) आणि वांग्याची मिक्स झणझणीत ,चमचमीत भाजी
साहित्य :
१वाटी ओल्या हरभऱ्याचे हिरवे दाणे
५ हिरवे वांगे मध्यम आकारात चिरलेले
२ कांदे बारीक चिरलेले
१२ लसूण पाकळ्या
२ ते ३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पुन तिखट
१ टीस्पून हळद
१ टीस्पूनस्पुन धने पूड
दीड टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून हिंग
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
स्टेप १: सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुवून मध्यम आकारात कापुन घ्यावी.
स्टेप २: कढईत १ टीस्पून तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या, उभा चिरलेला कांदा थोडा सोनेरी होई पर्यन्त परतून घ्यावे. कांदा ,लसूण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात कांदा , लसूण, ३ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर टाकून थोडी जाडसर पेस्ट तयार करणे.
स्टेप ३: परत कढईत दीड टेबलस्पून तेल घालून गरम करणे त्यात मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता आणि कांदा ,लसूण,हिरव्या मिरच्या ,कोथिंबीरीचे वाटण घालावे व 2 मिनीट परतून घ्यावे परतून झाले ओल्या हरभऱ्याचे दाणे टाकून झाकण ठेवून छान परतून घ्या.
स्टेप ४: नंतर त्यात हळद,लाल तिखट, धने पूड ,काळा मसाला घालून मिक्स करावे .नंतर त्यात कापलेली वांगी घालून झाकण ठेवून शिजू मध्यम गॅसवर शिजू द्या. आता थोडा पाणी टाकुन पुन्हा दहा ते पंधरा मिनिट मध्यम गॅसवर शिजू द्यावे.
स्टेप ५: भाजी शिजत आली की मीठ आणि कोथिंबीर घालावी भाजी तयार आहे. भाकरी , चपाती,भातासोबत सर्व करावी.
0 Comments