Sargunde chessy pasta stuffed momo recipe-:

वैदर्भीय देशी पौष्टिक सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमो रेसिपी-:


# chessy pasta stuffed momos recipe 

# sargunde pasta stuffed momo recipe in marathi

मोमोज हे सिक्कीम आणि नेपालचे एक लोकप्रिय खाद्य आहे.तिथले रहिवाशी मोठ्या आवडीने भोजनात किंवा नाश्त्यात खातात. मोमोज म्हणजे कणकेचा   गोळा किंवा मैद्याच्या गोळ्याच्या आत आपली मनपसन्द खाद्यसमुग्री भरून वाफेवर केली जाते. मोमोज भारताच्या उत्तर पूर्व राज्यात , मेघालय, नागालैंड, मणिपुर  राज्यात खूप लोकप्रिय आहे. 

वैदर्भीय देशी सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमो रेसिपी ही भारतातील वैदर्भीय महाराष्ट्रीयन देशी पास्ता सरगुंडे आणि चीझ  हे दोन्ही पदार्थ एकत्र करून केलेली पौष्टिक, चविष्ट सरगुंडे पास्ता हा  लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे.  

महाराष्ट्रातील विदर्भात आजही अनेक घरांमध्ये उन्हाळ्यामध्ये पारंपारिक पदार्थ बनविले जातात .त्यातील एक पदार्थ म्हणजे सरगुंडे .उन्हाळ्यात आंब्याचा रस आणि सरगुंडे हि खूप चवदार स्वादिष्ट डिश उन्हाळ्यात आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना पाहुणचार म्हणून दिला जातॊ. सरगुंडे हे पास्ता सारखे दिसतात .कांदा ,लसूण ,हिरवी मिरचीची फोडणी देऊन आपण इटालियन पास्ता पेक्षा स्वादिष्ट, चविष्ट ,पौष्टिक फोडणीचे सरगुंडे बनवू शकतो.

चीज दुधापासून बनलेला पदार्थ आहे.जगातील वेग वेगळ्या विविध ठिकाणी भिन्न-भिन्न रंग-रूप स्वादानुसार चीज बनविले जाते. चीज पासून स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपी बनविण्यासाठी उपयोग केला जातो. ह्यात  पास्ता, पिज्जा, सैंडविच, सलाद,भाजी , नान इत्यादि पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.

आपण भारतीय खास करून वेस्टर्न खाण्याला जेव्हा पण इंडियन ट्विस्ट देतो तेव्हा तो पदार्थ जबरदस्त स्वादिष्ट, चविष्ट होतो. तर चला आज आपण करूयात वैदर्भीय देशी सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमो रेसिपी. 

साहित्य :- 

सरगुंडे  बनविण्यासाठी साहित्य :-

४ टेबलस्पून  सरगुंडे 

१ टेबलस्पून पानकोबी किसलेली

1 टेबलस्पून टोमॅटो बारीक टुकडे केलेले

१ टेबलस्पून गाजर किसलेले 

१ टेबलस्पून सिमला मिरची किसलेली 

१ टेबलस्पून कांदा चीरलेला 

७ पाकळ्या लसुन बारीक टुकडे केलेले

३हिरव्या मिरच्या बारीक तुकडे केलेले

१ टेबलस्पून  कोथिंबीर 

जिरे-मोहरी(अर्धा छोटा चमचा)

मीठ चवीनुसार

१ टेबलस्पून तेल

दीड मॅगी मसाला पॅकेट्स

५कप पाणी 

५चीझ स्लाइस 

मोमो बनविण्यासाठी-:

4 टेबलस्पून गव्हाचे पीठ  

२टेबलसून तांदूळ पीठ 

मीठ चवीनुसार 

१टीस्पून तेल

पाणी आवश्यकतेनुसार

कृती :-

स्टेप१: सगळ्यात आधी एका भांड्यात साधारण 5 कप पाणी घेऊ त्यात एक चमचा तेल घालून पाणी उकळू द्यावे. पाण्याला उकळी आली कि त्यात सरगुंडे शिजवून घेणे. साधारण ६ ते ७ मिनिटे  सरगुंडे शिजल्यावर ते एका चाळणीत घेऊन त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकून बाजूला ठेवा. 






स्टेप२: गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर सोबतच एका पॅन मधे तेल घाला व गरम झाल्यावर लसुण कांदा व परतून घ्या. त्यानंतर त्यात सिमला मिरची, गाजर, टोमॅटो,  मैगी मसाला टाकून परतून घ्या. मैगी मसाल्यात मिठ, तिखट रहाते. तुम्हाला अवश्यक्याता वाट्यालास मिठ तिखट घाला. सर्व घटक एकत्र 7 घ्या. २-३ मिनिटे झाकण ठेवणे.नंतर त्यात त्यात उकडलेले सरगुंडे  पॅन मधे घाला ५ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा. आपला सरगुंडे पास्ता तयार आहे.

सरगुंडे जरा थंड झाले कि मग त्याचे मोमोज करायला घ्या.




स्टेप३: गव्हाचे पीठ आणि तांदूळ पीठ चवी पुरते मीठ व अर्धा छोटा  चमचा तेल  एकत्र करून पाणी घालून मळून घ्या. 






नंतर तयार पिठाचे बारीक गोळे करून पातळ लाटून घ्यावे. त्यात तयार सरगुंडे  आणि वरुण चीज स्लाइस stuff करून हवे  त्या आकाराचे मोमोज करून घ्या.

स्टेप४: सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून गरम करायला ठेवा आणि स्टिलच्या चाळणीला तेल लावून घ्या.तयार केलेले मोमोज चाळणीत १५ मिनिटांसाठी वाफवायला ठेवून द्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करून घ्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करून घ्या आणि ५ मिनिटानंतर झाकण काढा.

इडली पात्रात मोमोज वाफवून घेऊ शकतो.



स्टेप५: आपले गरमागरम मोमोज तयार. हे मोमोज तूम्ही टोमॅटो  चटणी, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. किंवा तसेही छान लागतात.




Post a Comment

0 Comments