Dal bhaji recipe in marathi

विदर्भ स्पेशल चवदार, हिरवीगार, पौष्टिक डाळ भाजी ( तूर डाळ पालक) :


# dal bhaji in marathi

# dal bhaji recipe

पालक डाळ भाजी हा  विदर्भातील special पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुती 

समारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार अशी डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. 

साहित्य:

१ पाव पालक बारीक चिरलेला 

१/२ वाटी तुरीची डाळ

१ वाटी बारीक चिरलेला कांदा

१ वाटी टोमॅटो

३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

८ ते ९ लसूण पाकळ्या चिरून

१ टीस्पून लाल तिखट

१/४ टीस्पून हळद 

दीड टेबलस्पून शेंगदाणे भाजलेले

१/२ टीस्पून धनेपूड    

१/२ टीस्पून  जिरेपूड 

१ टीस्पून गरम मसाला

मीठ, चवीप्रमाणे

२ टेबलस्पून तेल

फोडणीसाठी १/२ टीस्पून मोहरी ,जिरेदीड टीस्पून 

१/२ हिंग 

पाणी गरजेनुसार

कृती:

स्टेप १: कुकरमध्ये  पाणी घालून डाळ शिजवून घ्या. कुकर थंड झाला कि डाळ घोटून घ्या व त्या घोटलेल्या डाळीत चिरलेला पालक टाकून रवीने परत घोटून घ्या.






स्टेप २: कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी जिरे घालून तडतडू द्या. नंतर लसूण लसूण फोडणीला घाला. कांदा परतून घ्या.


स्टेप ३: २-३ मिनिटे कांदा परता मग त्यात टोमॅटो हिंग हळद, लाल तिखट , धने-जिरेपूड, गरम मसाला घालून परता.






स्टेप ४: घोटलेली डाळपालक घाला. मीठ आणि घालून ढवळा.

स्टेप ५.  डाळ पालक खूप जाड असेल तर थोडेसे पाणी घालून पात्तळ करा. ३-४ मिनिटे उकळत ठेवा.



स्टेप ६: गरम गरम डाल पालक भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.  कुकरमध्ये डाळीबरोबर शिजवल्यास त्यातली जीवनसत्त्वं  कमी होतात. डाळ-पालक जेवायच्या खूप आधी करून ठेवले तर न झाकता तसेच ठेवा. म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही.




Post a Comment

2 Comments

  1. Palak pan shijvun ghyaycha ka tur dali sobat

    ReplyDelete
    Replies
    1. कुकरमध्ये डाळीबरोबर शिजवल्यास त्यातली जीवनसत्त्वं कमी होतात. डाळ-पालक जेवायच्या खूप आधी करून ठेवले तर न झाकता तसेच ठेवा. म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही.

      Delete