श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर, लाडू रेसिपी

#सुंठ, हळद पाउडर लाडू

कृष्ण जन्माष्टमी स्पेशल सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर, गूळ लाडू रेसिपी लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. या निमित्त घरी अनेक गोड पदार्थ बनविले जातात.कृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील बनवला जातो. मी सुंठ वड्याचे स्वरूप बदलून आरोग्याला पोषक,सुंठ, हळद लाडू बनविले आहे.

यंदा तुम्हाला देखिल श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ बनवायचा असेल तर आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी सोपी आणि झटपट होणारी आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर लाडू रेसिपी देणार आहे.

हवामान बदलताच आजारांचा धोका वाढू लागतो. ताप, खोकला, सर्दी, शरीरावर वेदना, डोकेदुखी, अपचन, उलट्या आणि अतिसार सामान्य आहेत. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. होय, आपण हळद आणि आल्याबद्दल बोलत आहोत.हळद आणि आले आपल्याला आजारांपासून दूर ठेवते.

हळद आणि आले केवळ आपल्या तोंडाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. हळद आणि आल्याचा सेवन हे बर्‍याच रोगांचे खात्रीशीर औषध आहे.

साहित्य :-

 १मेम्बरसाठी रोज सकाळ संध्याकाळ एका महिन्यासाठी

1 टेबलस्पून सुंठ पावडर

1 टेबलस्पून चमचा हळद पावडर

1 टेबलस्पून चमचा खारीक पावडर

4 टेबलस्पून गूळ

1 टीस्पून विलायची पूड

1 टीस्पून मिरे पूड

2 टीस्पून घरी केलेले साजूक तूप

1/2 टीस्पून काळे मीठ

कृती :-

स्टेप १-प्रथम कढईत २ छोटे चमचे तूप गरम करा जास्त गरम नको.तूप गरम झाल्यानंतर त्यात सुंठ,हळद,खारीक, पाउडर, मिरे पूड, विलायचेची पूड,काळे मीठ २ सेकंद परतून घ्या.जास्त परतू नका.


 स्टेप २-त्यानंतर लगेच त्या मिश्रणात गूळ टाकून एकजीव करा. मिश्रण एकजीव झाले की लगेच गॅस बंद करा. जर ह्या गोळ्या बनविण्यासाठी तुम्ही थोडा नरम गूळ घेतला तर लाडू बनविण्यासाठी सोपे जाईल.गूळ आणि खारीक पावडर टाकल्यामुळे लाडूला प्राकृतिक गोडपणा येतो.

 स्टेप ३- आता हे मिश्रण हलके थंड झाल्यावर जेम्सच्या गोळी एवढे छोटे छोटे लाडू (गोळ्या) बनवा. आता तयार झाले आरोग्याला पोषक सुंठ, हळद पाउडर लाडू. बनवीलेल्या लाडूंना हवाबंद डब्यात भरून ठेवा.




Post a Comment

0 Comments