Healthy paushtik palak pulav-:

 हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव :

# paushtik palak pulav

# healthy paushtik palak pulav

#पौष्टिकआहाररेसिपी

#पुलाव 

#हंडीपालकपुलाव 

पार्टी आणि सणांच्या दिवशी काही तरी स्पेशल हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल आणि मुलांना टिफिनसाठी साठी हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट  हंडी पालक पुलाव बेस्ट तर जरूर ट्राय करा हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव.

साहित्य :

२ वाट्या बासमती तांदूळ

१ पाव किलो पालकाची पेस्ट

एक वाटी चिरलेला कांदा

१ टोमॅटो बारीक चिरलेले

१२ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या

२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

दीड टेबलस्पून बदामाचे तुकडे

१ टेबलस्पून किसमिस

१ टेबलस्पून कोथिंबीर

दीड टेबलस्पून तूप

२ लवंग

२ मोठी विलायची

५ मिरी

२ चक्रीफुल

२ दालचिनी

३ पाने तेजपत्ता

१टिस्पून जिरे

अर्धा टिस्पून मोहरी

१ टिस्पून गरम मसाला

कृती :

स्टेप १: प्रथम  पालक स्वच्छ धुवून पेस्ट करून घ्या.तांदूळ धुऊन निथळावे. 


स्टेप २: आता हंडीत १ टेबलस्पून तूप घाला अर्धा चमचा जिरे घालून तडतडू द्या .त्यानंतर हंडीत लवंग, मिरी, दालचिनी' तेजपत्ता, चक्री फुल , विलायची परतून घ्या आणि त्यात निथळलेले बासमती तांदूळ घालून परतून घ्या .त्यानंतर पालक पेस्ट तांदुळात टाकून मिक्स करा आणि २ ग्लास पाणी किंवा तुमच्या अवशक्यतानुसार पाणी घालून तांदूळ शिजवून घ्या.







स्टेप ३: तांदूळ शिजेपर्यंत एक कढईत उरलेले तूप गरम करा आणि त्या तुपात मोहरी,जिरे , लसूण कांदा परतून घ्या. त्यात  बदामाचे तुकडे ,किसमिस,टोमॅटो ,

गरम मसाला मीठ टाकून परतून घ्या.  








स्टेप ४: नंतर ही फोडणी हंडीत शिजलेल्या पुलाव मध्ये घालून मिक्स करून ५ मीनीट गरम करा.  तयार झाला आपला  हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव . वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करावा.



Post a Comment

0 Comments