इंदोरी भुट्टे का किस :

#पौष्टिकआहाररेसिपी

#पश्चिममध्यप्रदेश

#इंदोर

भुट्टे का किस मध्य प्रदेश का एक healthy आणि स्वादिष्ट व्यंजन आहे. आहे. जसे की नावानेच स्पष्ट आहे. ह्या पदार्थात मुख्य घटक म्हणजे मका.भुट्टयाला मसाले आणि दुधासोबत चांगल्या तऱ्हेने शिजविल्या जाते त्यामुळे ह्या डिश चांगला स्वाद येतो. हया पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी ह्यात हिरव्या मिरच्या ,हिंग, खोबऱ्याचा किस आणि लिंबूचा उपयोग केला जातो.भुट्टे का कीस मध्य प्रदेशचा विशिष्ट स्ट्रीट फूड आहे.

तसे पाहिले तर ह्या खास डिश चा स्वाद तुम्ही मध्यप्रदेश कुठेही घेऊ शकता. खरे तर ही डिश इंदौरच्या सराफा बाजारात जोशी दही बड़ा हाउसला जास्त फेमस आहे.

जर तुम्हाला इंदोरी भुट्टे का किसाचा खरा स्वाद घ्यायचा असेल तर..... तर चला मग आज आपण इंदोरी भुट्टे का किस हा स्वादिष्ट पदार्थ करूयात.

साहित्य :

2 कप स्वीट कॉर्न, किसुन घ्या किंवा वाफवून घ्या

1 टेबलस्पून तेल

1/2 कप दूध

2 टेबलस्पून खोबरा किस

1/2 टिस्पून जिरा

1/2 टिस्पून मोहरी

१/४टिस्पून मिरची पावडर

१/४टिस्पून हळद पावडर

1 चिमूटभर हिंग

1 टिस्पून हिरवी मिरची (बारीक कापलेली)चवीनुसार

1/2 टिस्पून साखर

2 छोटे चम्मच तेल

1 (1/2 टेबलस्पून) कोथिंबीर बारीक कापलेली

1/2 लिंबूचा रस

कृती :-

स्टेप १ - प्रथम भुट्टयाचा किस बनविण्यासाठी भुट्टयाचे दाणे काढा आणि भुट्टयाच्या दाण्यांना मिक्सर मध्ये फिरवून जाडसर वाटून घ्या. ( तुम्ही भुट्टयाना किसणीच्या साहाय्याने किसूनपन घेऊ शकता

   


स्टेप २ - एका कढईत गॅसच्या मध्यम आचेवर वर तेल गरम करा, त्याच्यात मोहरी, जिरे टाका, जसे मोहरी जिरे तडतडल्यावर गॅस कमी करा आणि त्याच्यात हींग, बारीक कापलेली हिरवी मिरची घालून अर्धा मिनीट किंवा मिरचीचा रंग बदले पर्यंत परता

स्टेप ३ - आता यात भुट्टयाचा जाडसर किस,लाल तिखट, हळद, मीठ आणि साखर घालायची असेल तर घालाआणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता ह्यात अर्धा कप दुध मिसळून परतून घ्या.

स्टेप ४ - नंतर खोबऱ्याचा किस घाला. कढईवर झाकण ठेऊन गॅसच्या मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवू द्या. मधे मधे चमच्याच्या सहाय्याने परतून खालीवर करा.नंतर गॅस बंद करा. आणि किसावर लिंबू पिळून मिक्स करा.

स्टेप ५ - भुट्टे का कीस खाण्यासाठी तयार आहे त्यावर खोबरा किस आणि कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments