हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात :
#पौष्टिकआहाररेसिपी
#हिरव्याकांद्याच्यापातीचाफोडणीचाभात
#हिरव्याकांद्याचीपात
हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.
भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे.तांदळाला आपल्याकडे पूर्वीपासूनच महत्त्व आहे. घरात तांदूळ असणे हे भरभराटीचे मानले जाते. सर्व धार्मिक कार्यात तांदळाचीच गरज असते. आपल्याकडे तांदळाच्या पिठाची भाकर, घावणे, आंबोळी, डोसा, इडली, लाडू असे अनेक प्रकार केले जातात,.
रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात, साखर भात, फोडणीचा भात, दही भात, गोळा भात, बिर्याणी, पुलाव, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस .
आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो खाली दिलेली कृती फोडणीच्या भाताची आहे पण हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात
आहे .थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे.
साहित्य:
२दिड कप शिजवलेला भात
१ पाव कांद्याची पात कांद्यासाहित बारीक चिरलेली
७ ते ८ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
१ ते टीस्पून हळद
१/२ कोथिंबीर बारिक चिरलेली
हिंग
मीठ गरजेनुसार
फोडणीसाठी:
१ छोटा चमचा जिरे
७-८ कढीपत्त्याची पाने
१ टेबलस्पून तेल
कृती:
साधा मोकळा भात बनवून घ्यावा किंवा रात्रीचा उरलेला भात सुद्धा वापरू शकता.
स्टेप १: एका कढईत तेल गरम करायाला ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकून तडतडू द्या.नंतर लसूण, हिरवी मिरची,हिंग आणि कढीपत्ता,पातीचा चिरलेला कांदा टाकून परतून घ्या. ( कांद्याची पात चिरलेली बाजूला ठेवा.) आता हळद घालून मिक्स करा.
स्टेप २:आता शिजवलेला भात व मीठ आणि बाजूला ठेवलेली बारीक चिरलेली कांद्याची पात घालून परतावे झाकण ठेवून ५ ते 7 मिनिटे मंद गॅसवर भात शिजू दयावा.
स्टेप ३: सर्विंग बाउल मध्ये भात काढून घ्या त्यावर कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करा.
0 Comments