हरियाणाची चटपटीत बेसन मसाला रोटी :


#पौष्टिकआहाररेसिपी

#उत्तरभारत

#हरियाणा

#हरियाणाबेसनमसालारोटी

हरियाणाच्या खाण्यापिण्यात साधेपणा दिसून  येतो. इथले लोक भाताच्या तुलनेत स्वादिष्ट आणि पौष्टीक रोटीला (पोळीला) पसंद करतात. ह्याच्या सोबतच हरियाणात दुधाचे उत्पादन जास्त होते , त्यामुळे जास्त करून इथल्या पदार्थांमध्ये दूध आणि दह्याचा जास्त वापर केला जातो. तर चला आज आपण करूयात हरियाणाची चटपटीत बेसन मसाला रोटी.

साहित्य :

१ कप बेसन

१ १/२कप गहू पीठ

१/२ टीस्पून हळद पावडर

१ टीस्पून ओवा 

१/२ कप दही

नमक 

मसाला बनविण्यासाठी साहित्य :

११/२ टीस्पून लाल मिरची पावडर

१ टीस्पून जीरा पावडर

१ टीस्पून धने पावडर

१ टीस्पून आमचूर पावडर

 १ ते दीड साजूक तूप

कृती :

स्टेप १: प्रथम एका परातीत बेसन ,गहू पीठ ,हळद ओवा मीठ मिक्स करून गोळा मळून घ्या आणि गोळा तयार करा.



स्टेप २
: मसाला भरण्यासाठी वरील तिखट, जिरे,धने,आमचूर पावडर आणि साजूक तूप भरून  चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. 

स्टेप 3: गोळ्याला चुरून घ्या .त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. त्यातला एक छोटा गोळा घ्या आणि पुरी सारखा लाटून घ्या.आता त्या लाटलेल्या पुरी सारख्या पोळीला तयार केलेला मसाला लावा आणि मधून पोळीला मोडून घ्या व त्यावर पुन्हा मसाला लावून त्रिकोणी घडी घालावी आणि त्रिकोणी पराठा (दुपोडी पोळी, दोन घडीच्या ) पोळी सारखी लाटून मोठी करावी. सगळीकडे सारखीच जाड लाटली गेली पाहिजे. 

स्टेप 4: आता तवा गरम करा मसाला रोटी भाजण्यासाठी तवा मध्यम तापलेला हवा. कमी तापला तर पोळीच्या खालचा भाग कडक होऊ लागेल. आता मसाला रोटी तव्यावर शेकण्यासाठी टाका थोड्या वेळाने दोन्ही कडून शेकल्यानंतर मसाला रोटीला तूप लावून शेकून घ्या.




स्टेप ५: असेच सर्व मसाला रोटी बनवून ग्रेवी वाली भाजी,लोणच्या किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

Post a Comment

0 Comments