चीज, दुधी भोपळ्याचा पौष्टिक, टेस्टी कुरकुरीत वड्या नाश्ता मुलांसाठी :-

दुधी भोपळा  हा आरोग्याला पोषक, पौष्टिक आहे. दुधी भोपळा ही विषनाशक औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित फळभाजी आहेत.दुधीमध्ये दुधासारखे पोषक गुण आहेत.दुधी नेहमी कोवळा, ताजा खावा तो जास्त गुणकारी असतो. 

दुधी भोपळ्यापासून आपण एक  वेगळा पदार्थ बनवणार आहतो. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातील.दुधी भोपळा जरी आवडत नसेल तरी किसलेला दुधी भोपळा, राजगिरा पीठ, बेसन, इडली रवा, आणि मुलांच्या आवडीचे चीजने बनविलेल्या  टेस्टी वड्या सर्वजण आवडीने खातील.

साहीत्य:-

१ अर्धा दुधी भोपळा (किसलेला) 

१ सिमला मिरची बारीक कापलेली 

४ स्लाइस चीज 

१ छोटी वाटी इडली रवा 

१ छोटी वाटी राजगिरा पीठ 

१ छोटी वाटी बारीक बेसन 

१ टे स्पून लसूण-हिरवी मिरची पेस्ट   जाडसर 

१ टी स्पून  ओवा -जिरे पावडर जाडसर                             

२ टे स्पून कोथिंबीर बारीक चीरलेली 

मीठ चवीने

तेल तळण्यासाठी किंवा शॉलो फ्राय करण्यासाठी

पाणी अर्धी वाटी किंवा आवश्यकतेनुसार 

कृती:

स्टेप १ - प्रथम एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये किसलेला दुधी भोपळा , सिमला मिरची बारीक कापलेली, बेसन ,इडली रवा, राजगिरा पीठ व लसूण हिरवी मिरची जाडसर पेस्ट, १ टी स्पून ओवा -जिरे जाडसर पूड, मीठ,  आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. मग लागेल तसे पाणी वापरून भज्या प्रमाणे पीठ भिजवून घ्या.पातळ नको. 


स्टेप २ - मग स्टीलचा पोळीचा किंवा कुकरचा पसरट डब्बा  घेऊन त्याला  तेल लावून त्यामध्ये अर्धे मिश्रण टाकून एक सारखे करून घ्या. त्यावर ४ चीज स्लाइस एक एक करून गोल पसरून ठेवा.  परत उरलेले मिश्रण चीज स्लाइसवर  पसरून,  चीज स्लाइस ला झाकून टाका. 



स्टेप ३ - ह्या नंतर गॅसच्या मंद आचेवर एका भांड्यात पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवा. पाणी गरम होई पर्यंत भांड्यावर बसेल अशी ऐक चाळणी घ्या.पाणी उकळल्यावर त्यावर जाळी ठेवा. त्या जाळीवर आपण तयार केलेले चीज स्लाइस दुधी भोपळा मिश्रणाचा डब्बा ठेवून त्यावर  झाकण ठेवून २५ ते ३०मिनिटें वाफवून घेणे.


स्टेप ४ - चांगले वाफवून झाल्यावर  मिश्रणाचा डब्बा थंड होऊ द्या. डब्याला एका प्लेट मध्ये उबडा ठेवून ढोकळ्या प्रमाणे काढून घ्या. आणि त्याच्या वड्या कापून घ्या. एका प्लेट मधे काढून फ्रीझ मधे १५ मिनीटांसाठी ठेवा. 




 स्टेप ६- ह्या नंतर गॅसच्या आचेवर कढईत तेल गरम करणे आणि मंद आचेवर थोड्या वेळाने वड्या  दोन्ही  बाजूने कुरकुरीत तळून घ्या. गरमागरम  चीज दुधीच्या वड्या टोमॅटो सॉस किवा चटणी बरोबर सर्व्ह करा.  



टीप :-

नॉनस्टिक तवा गरम करून थोडे तेल घालून त्यावर दुधीच्या वड्या ठेवा बाजूनी थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी चांगल्या शॉलो फ्राय पण पण करू शकता.

Post a Comment

0 Comments