पावसाळ्याचा आनंद आणि गरम गरम झणझणीत, गावरान, पौष्टिक बाजरी, मुंग डाळ सूप🍜 :- 

पावसाळा आणि गरम गरम सूप पिण्याचा आनंद वेगळाच असतो. सूप हे झटपट बनणारे तब्येतीला उपयुक्त आणि फायदेशीर, स्वादिष्ट असणारे आणि वेळ वाचवणारी अशी हि डिश आहे.

सूप बनवायला सोपे तर आहेच पण हे एक न्यूट्रिशन पावर हाऊस असून, त्यात कार्बोहैड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स चा समावेश असतो.  

बहुतेक करून सर्वाना पालक, टोमॅटो सूप आवडते.पण आज  मी तुम्हाला बाजरी,मूंग सूप रेसिपी सांगणार  आहे. बाजरी ,मूंग रेसिपी घरी असलेल्या उपलब्ध सामुग्रीच्या मदतीने बनवू शकतो.

बाजरी,मुंग डाळ सूप हे सूप म्हणून पितातच पण आमटी  म्हणून भात आणि पोळी सोबत पण खाऊ शकतो .हया बाजरी, मूंग सूपाला शिंगोरी सूप किंवा आमटी पण म्हणतात. शिंगोरी हे नाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी गावामुळे पडले. 

साहित्य .:

बाजारी २ टीस्पून 

मुंग डाळ  सालासकट २टीस्पून 

खोबरा किस २ टीस्पून

७-८ पाकळ्या लसूण 

कोथिंबीर १ छोटी वाटी 

हिरव्या मिरच्या २किंवा३   

तूप  किंवा तेल अर्धा मोठा चमचा, किंवा तुमच्या आवडीनुसार  

फोडणीसाठी जिरे

१ छोटा चमचा हळद पावडर 

१ छोटा चमचा धने पावडर 

१ छोटा अर्धा चमचा गरम मसाला 

मीठ चवीनुसार 

पाणी आवश्यकतेनुसार 

कृती : 

स्टेप १ - खोबर ,बाजरी  किंवा सालासकट मुंग डाळ, खोबर वेग वेगळे ब्राउन भाजून घ्या. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात मध्ये रवाळ वाटून घ्या.मिक्सरच्या भांड्यात , लसूण,  कोथिंबीर हिरव्या मिरच्या, धने पावडर मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. 

स्टेप २ - कढईत तेल गरम करून जिरे फोडणीसाठी टाका.त्याच कढईत फोडणीत लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या, धने पावडरची पेस्ट टाकून 2 मिनिट परता. त्यात हळद पावडर टाकून काही सेकंद परता. तेल सुटेपर्यंत परता . त्याच कढईत खोबरं , बाजरी आणि डाळीचे वाटण टाकून मिसळा आणि परतून  घ्या . त्यात गरम पाणी आवश्यतेनुसार फोडणीच्या वरणाला जसे पाणी मिसळतो तसे टाका. त्यात गरम मसाला पावडर व चवीनुसार मीठ व्यवस्थित मिसळून मध्यम आचेवर झाकण ठेवून १० मिनिटे शिजू द्या. 




स्टेप ३ - फ्रेश कोथिंबीर टाका आणि गरमागरम सूप सर्व करा.







Post a Comment

0 Comments