राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढ़ी आणि मुंग पकोडे

#पौष्टिकआहाररेसिपी

#पश्चिमराजस्थान

#मुंगकढीमुंगपकोडे

कढी चे नाव काढल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते. हल्की आंबट आंबट कढी खाण्याची मजा काही वेगळीच आहे.आज पर्यंत आपण बेसन ताकात घालून बनविलेली कढी खाल्ली असेल. आज आपण राजस्थान मध्ये मुंग डाळीची कढी आणि मुंग डाळीचे पकोडे बनवितात. हे राजस्थानचे पारंपरिक व्यंजन आहे . तर चला मग आज बनवुयात राजस्थानी फेमस मारवाड़ी मुंग कढ़ी आणि मुंग पकोडे.

साहित्य :

३ कप भिजवलेली पिवळी मूंग डाळ

3 कप दही

3 चुटकी हींग

१ टिस्पून जिरे

१/२ टिस्पून मेथी दाना  

१टिस्पून हळद पाउडर

 ५ हिरव्या मिरच्या

१ छोटा तुकडा अद्रक

१ टिस्पून लाल तिखट

१ टिस्पून काळा मसाला

चवीनुसार मीठ

१ टेबलस्पून कोथिंबीर

तळण्यासाठी तेल

कृती : 

स्टेप १ - सगळ्यात पाहिले मुंग डाळीला २ ते ३ तास भिजू  घाला.३ तासानंतर  चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि त्यानंतर मिक्सर मुंग डाळ , हळद, थोडे मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर  मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. आता या जाडसर वाटलेल्या डाळीतून  २ ते अडीच चमचे वाटलेली मुंग डाळीत फेटलेले दही घालुन कमीत कमी दिडलिटर पाणी आणि हळद, मीठ घालुन मिक्स करा आणि घोळ ( मिश्रण) तयार करा आणि दुसरे वाटलेले मिश्रण पकोडे तळण्यासाठी ठेवा.

 



स्टेप २
- आता मुंग डाळीचा वाटलेला दुसरा भाग घ्या आणि मुंग पकोडे तळण्यासाठी मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा, त्यात तिखट मीठ लागल्यास घाला. त्यानंतर एक कढईत तेल गरम करा. तेल  गरम झाल्यावर  त्या तेलात  वाटलेल्या मुंग डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे पकोडे  हलके लालसर होईपर्यंत तळुन घ्या.

स्टेप ३ - आता दुसरं जाड बुडाचे भांड गॅसवर ठेवा आणि त्यात २ टिसपून तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात  जिरे, हिंग ,मेथी कडीपत्ता टाकुन तडका लावा .परत त्यात हळद, तिखट ,काळा मसाला घाला आणि  त्यात पाहिले तयार ठेवलेले वाटलेल्या मुंग डाळ आणि दही, पाण्याचा घोळ  टाका कमीत कमी २० ते २५ मिनिट उकळेपर्यंत चमचा चालवत गॅस वर मंद आचेवर ठेवा. त्यात चवीनुसार मीठ घाला . त्यात कोथिंबीर आणि पकोडे टाकून गरमागरम सर्व्ह करा.




Post a Comment

0 Comments