खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी ब्राउन राइस, मूग डाळ आणि वांग्याची  पौष्टिक स्वादिष्ट खिचडी :




#पौष्टिकआहाररेसिपी
#खानदेश
#खिचडी 
#नाचणी
#Swati's Kitchen
#paushtik aahar recipes
#paushtikaaharrecipes258.blogspot.com

नाचणी :नाचणीला काही भागात नागली , रागी  किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते. 
नाचणीत खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व उर्जा साधारणपणे इतर तृणधान्या इतकीच आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचे आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे.

मोड आलेली नाचणी :नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात ८ तास बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात.  ही आहे मोड आलेली नाचणी.

ब्राउन राईस :पांढऱ्या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.

 मूग :मुग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.

तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी ब्राउन राइस,  मूग डाळ आणि वांग्याची स्वादिष्ट खिचडीचा आस्वाद घेऊ या .

साहित्य :
 २ छोटी वाट्या ब्राउन राईस,  
 पाऊण छोटी वाटी मुंग सालासकट
१ छोटी वाटी मोड आलेली नाचणी
१२  बदामाचे मध्यम तुकडे
कडीपत्त्याची ७  ते ८ पाने
२ हिरवी मिरची कापलेली   
१ टीस्पून हळद  पाउडर 
१ टीस्पून तिखट पाउडर
१ टीस्पून गरम मसाला पाउडर
१/२ टिस्पून हिंग पाउडर
१/२ टीसपून जिरे
१/२ टीसपून मोहरी
१  मोठा कांदा  मध्यम आकाराचा चिरणे .
१० ते १२ लसूण पाकळ्या बारीक तुकडे कापणे . 
२ वांग्याच्या फोडी मध्यम आकारात कापणे .
१ मोठा टोमॅटो मध्यम आकारात चिरणे.
१ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली.
मीठ  - चवीनुसार 
सव्वा टेबलस्पून तेल
2 टीसपून तूप
अडीच ग्लास पण

कृती: 
नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात ८ तास बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात.  हे आहे मोड आलेली नाचणी. ब्राउन राइस ५ तास पाण्यात भिजविणे , मूग सालासकट ४ तास भिजविणे.



मोड आलेली नाचणी  आणि मुग  कुकरच्या भांड्यात पाणी न घालता २ शिट्ट्यांमध्ये वाफवून घेणे. 






त्याच कुकर मध्ये सव्वा मोठा चमचा तेल टाकून गरम करणे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे टाकणे . जिरे मोहरी  तडतडल्यानंतर  त्यात लसूण, मिरच्या कांदा  हिंग , कडीपत्याची पाने टाकून खरपूस  होऊ देणे. नंतर  त्याच कुकरमध्ये  टोमॅटो  आणि वांगे चिरून फोडणीत टाकून परतून घेणे. 











 
आता वाफवलेले वरील  नाचणी, मूग , ब्राउन राईस  नाचणी आणि  त्यात हळद , तिखट,  गरम मसाला चवीनुसार मीठ  बदाम ,तूप घालून मिक्स करावे.३ ग्लास किंवा तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून कुकरचे झाकन
बंद  करा. व मंद आचेवर खिचडी शिजवू द्या. 









६ शिट्ट्यानंतर  प्रेशर कमी झाल्यावर  कुकरचे झाकण उघडा खिचडी शिजवून तयार.आपली  खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी ब्राउन राइस, मूग डाळ आणि वांग्याची  पौष्टिक स्वादिष्ट खिचडी तयार. 


खिचडीवर कोथिंबीर टाकून सजवा .गरमा गरम  दही, लोणचं आणि  चटनी सोबत  किंवा फोडणीच्या ताकासोबत वाढा आणि खा.



Post a Comment

0 Comments