पौष्टिक कांदा, जवस चटणी  सलाद पराठा :



  

भारतात स्वयंपाकघरात पराठा खूपच प्रसिद्ध आहे.  सगळ्यात सोपा म्हणजे साधा पराठा .सध्या पराठ्यांचे पण खूप प्रकार आहेत.जसे गोल पराठा, त्रिकोणी पराठा, चौकोनी पराठा, दुपोडी पराठा अजून खूप पराठे आहेत. 


सध्या पराठ्यानंतर आपण पाहू  काहीतरी पौष्टीक असे जिन्नस कणकीच्या गोळ्यात भरतात. ह्यात सर्वासाधारण लोकप्रिय आहे आलू पराठा. पुष्कळ गृहिणि वर्षभर  जे मोसमी भाज्याआणिअन्नध्यानयापासून पराठे बनविता येतात. आज आपण सलाद हा क्लू घेऊन थोड्या वेळेत चपात्या बनवतो त्या पद्धतीने फक्त आत जवस चटणी कांदा, मिरची, कोथिंबीर , हिरवी मिरचीची सलाद गोळ्यात लगेच टाकुन बनवू शकतो. ज्यांना नाश्ता पोटभरून करायची सवय आहे त्यांना हा पौष्टिक कांदा जवस चटणीचा पराठा आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिकष्ट घ्यायची गरज नाही सोप्यात सोप्या पद्धतीने कांदा जवस चटणी पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊ या.

.

साहित्य :

३ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा

७ टिस्पून जवस चटणी

१ टिस्पून तिखट 

१ टेबलस्पून कोथिंबीर

१ हिरवी मिरची बारीक केलेली

मीठ

तेल

गव्हाचे पीठ


कृती :


स्टेप १- गव्हाचे पीठ मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. चांगली मऊसर कणिक तयार करावी.



स्टेप २- एका भांड्यात  कांदा, जवस चटणी,  तिखट , मीठ  कोथिंबीर मिक्स करणे व त्यानंतर त्या सलाद मध्ये  २ टीस्पून जवसाचे तेल घालून चांगले मिक्स करून कांदा जवस सलाद सारण तयार करणे. 




स्टेप ३- गव्हाच्या कणकेचे गोळे करून थोडेसे लाटून घ्यावे त्या वर कांदा ,जवस चटणी  सारण पुरणाच्या पोळी भरतो तसे भरून गोळा तयार करणे.  






स्टेप ४- सारण भरलेला पुन्हा अलगद लाटून घ्या. आता हा पराठा चपाती बनवतो तसा बनवून घ्या आणि गॅसच्या  मंद आचेवर तव्यावर  पराठ्याच्या बाजूने ,मध्ये ,खाली तेल घालून शेकून  दोन्ही बाजूने शेकून घ्या. तयार आहे गरमागरम पौष्टिक कांदा, जवस चटणी  सलाद पराठा. 





स्टेप ५- टीप: तसे जवस चटणीत तिखट , मीठ असते . पण तुमच्या अवश्यकतेनुसार तिखट मीठ  घेऊ शकतात.



Post a Comment

0 Comments