Dhokla easy recipe

 दलिया (क्रॅक गव्हाचा जाड रव्याचा)  पौष्टिक ढोकळा रेसिपी  :



# dhokla recipe in marathi
# dhokla easy recipe

ढोकळा हे एक  गुजरात राज्याचे  पारम्परिक व्यंजन आहे. हे मुख्यत: तांदूळ ,रवा, चना ह्या घटकांपासून बनतो.ढोकळ्याला नाश्त्यात, आणि जेवणात आणि खातात आणि इतर वेळेस हल्के-फुल्के खाण्यासाठी करतात.

आज इथे  मी  ढोकळा बनविणार आहे  पण दलियाचा ढोकळा बनविणार आहे.

दलिया  म्हणजे हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते.दलिया संपूर्ण कच्च्या गहूने बनविल्यामुळे, त्यात संपूर्ण गव्हाचे पोषण असते. दलियाला गहू रवा ,तुटलेले गहू, क्रॅक गहू,म्हणूनही ओळखले जाते . 

न्याहारी बनवण्यासाठी किंवा जेवणात सर्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकर बनणारी आणि सोपी कृती आहे.

दलिया खाण्यासाठी स्वादिष्ट  पौष्टिक आहे. दलिया मध्ये प्रोटीन सोबतच  फायबर, कैल्शियम, मिनरल, विटामिन, एंटीऑक्सीडेंट् असतात .दलिया पासून खिचड़ी,दलिया शिरा, लापशी, ढोकळा असे खूप प्रकारचे पदार्थ बनविता येतात. तर चला मग आज दलिया (क्रॅक गव्हाचा जाड रव्याचा)  पौष्टिक ढोकळा बनविणार आहोत.

साहित्य :

सव्वा कप दही

२ १/२ कप दलिया

२ हिरव्या मिरच्या,४ पाकळ्या लसूण,  जिऱ्याची पेस्ट

१ टेबलस्पून कोथिंबीरीची पेस्ट

चवीनुसार मीठ

१/२ टिस्पून सोडा

पाणी आवश्यकतेनुसार

तडक्यासाठी- 

१/२ टेबलस्पून तेल

१ टिस्पून मोहरी

१ टिस्पून जिरे

७ ते ८ कडीपत्याची पाने

२ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या

२ टिस्पून नारळाचा किस

१ टीस्पून तीळ 

1/2 टिस्पून हिंग

१/२ टिस्पून कोथिंबीर ढोकळ्याच्या वर सजविण्यासाठी 

बारीक चिरलेला

कृती :

स्टेप १: प्रथम दलियाला पाण्याने चांगले धुवून घ्या. एका भांड्यात दलिया आणि दह्याला एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्ट मिश्रण तयार करा. पातळ मिश्रण नको. वरील मिश्रणावर झाकण ठेऊन अडीच तासासाठी बाजूला ठेवा.अडीच तासानंतर त्या मिश्रणात हिरवी मिरची, लसूण, जिरे कोथिंबीर पेस्ट, मीठ घालून  हलक्या हाताने मिक्स करा.








स्टेप २: आता त्या मिश्रणात १/२  टिस्पून सोडा घालून पटापट एकाच दिशेने अंद हलक्या हाताने ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. मग स्टीलचा पोळीचा किंवा कुकरचा पसरट डब्बा  घेऊन त्याला  तेल लावून त्यामध्ये तयार मिश्रण टाकून एक सारखे करून घ्या. ह्या नंतर गॅसच्या मंद आचेवर एका  कढईत पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवा.  नंतर त्यावर जाळीची हॉटप्लेट स्टँड ठेवा .पाणी गरम होई पर्यंत भांड्यावर बसेल अशी ऐक चाळणी घ्या.पाणी उकळल्यावर त्यावर जाळी ठेवा. त्या जाळीवर आपण  वरील दलिया मिश्रणाचा डब्बा ठेवून त्यावर झाकण ठेवून २५ ते ३०मिनिटें वाफवून घेणे.





स्टेप ३: जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करून घ्यावी. फोडणीच्या भांड्यात  तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ टीस्पून हिंग आणि कढीपत्त्याची पाने, तीळ, खोबऱ्याचा किस घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी.

स्टेप ४: २५ ते ३०मिनिटांनी  गॅस बंद करावा. १-२ मिनीटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला की काढून घ्यावा.डब्याला एका प्लेट मध्ये उबडा ठेवून घ्या. एका प्लेट मधे काढून ठेवा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.सुरीने काप करून वड्या पाडून घ्या. 

स्टेप ५: सुरीने काप करून घ्यावेत. वरून कोथिंबीर घालून गरमागरम ढोकळा सर्व्ह करा आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.




Post a Comment

0 Comments