इन्स्टंट घरगुती चटपटीत, सुगंधित चाट मसाला :


#पौष्टिकआहाररेसिपी 

#GA4

#week6

#चाट

#चाटमसाला

#इन्स्टंटघरगुतीचटपटीतसुगंधितचाटमसाला

चाट खायला तर सर्वाना खायला आवडते. नेहमी आपण चाट मसाला घालून पदार्थ बनवीत असतो. आपल्याला नेहमीच चाट मसाल्याची आवश्यकता पडते. बाजारातला चाट मसाला खूपदा भेसळयुक्त असतो , ज्यामुळे हवी तशी चवही येत नाही आणि आरोग्याला धोका देखील पोहोचतो. त्यावर सोपा उपाय म्हणजे आपण घरच्या घरी चाट मसाला बनवणे.बाजारात चाट मसाला मिळतो पण बाजारातला चाट मसाला खूपदा भेसळयुक्त असतो , ज्यामुळे हवी तशी चवही येत नाही आणि आरोग्याला धोका देखील पोहोचतो. त्यावर सोपा उपाय म्हणजे आपण घरच्या घरी चाट मसाला बनवणे.

एखादया वेळेस  घरी आपण पाणीपुरी, शेव पुरी ,दहीपुरी सलाद चाट, किंवा फ्रुट्स चाट बनवायला बसतो आणि अचानक लक्षात येते चाट मसालाच नाही तेव्हा घाबरून जायचे काही काम नाही मार्केट मध्ये जाण्याची गरज पण पडणार नाही. आपण घरीच इन्स्टंट घरगुती चाट मसाला बनवू शकतो. आपण रोजच्या वापरातल्या साहित्यापासून चटपटीत चाट मसाला कसा बनवायचे ते पाहूया. तर चला आज आपण इन्स्टंट घरगुती चाट मसाला घरी बनवुयात.

साहित्य :          

३ टिस्पून जिरे पावडर

३ टिस्पून धने पावड

१ टिस्पून मिरे पावडर 

१ टिस्पून सुंठ पावडर

2 टिस्पून आमचूर पावडर

दीड टिस्पून काळे मीठ /तुमच्या चवीप्रमाणे

१/४ टिस्पून हींग 

कृती :

प्रथम एक प्लेट मध्ये ३ टिस्पून जिरे पावडर,३ टिस्पून धने पावडर,१ टिस्पून मिरे पावडर, १ टिस्पून सुंठ पावडर,2 टिस्पून आमचूर पावडर,दीड टिस्पून काळे मीठ, १/४ टिस्पून हींग घ्या. 

स्टेप १: सर्व मसाले एकत्र मिक्स करून घ्या. 


स्टेप २: नंतर वरील मिश्रण मिक्सर मध्ये बारीक पावडर होईपर्यंत फिरवुन घ्या.


स्टेप ३: आपला चटपटा ताजा सुगंधित मसाला तयार आहे.


 
स्टेप ४: चाट मसाला एका बाउल मध्ये काढा थंड होऊ द्या. 

नंतर को एयरटाइट काचेच्या बरणीत भरून ठेवा.

Post a Comment

0 Comments