Methi besan pakode recipe

गुजरातचे मोस्ट पॉप्युलर  ट्रेडिशनल व्यंजन मेथी ना गोटा (मेथी बेसनाचे पकोडे) :

गुजरातचे मोस्ट पॉप्युलर  ट्रेडिशनल व्यंजन म्हणजे मेथी ना गोटा,ज्याला स्नॅक्स म्हणून सर्व्ह केले जाते किंवा सणांच्या वेळेस सुद्धा केले जातात.जर आपल्याला  ट्रेडिशनल स्नैक्स खायचे असेल तर जरूर ट्राय करा हे सोप्पे आणि लवकर होणारे  मेथी ना गोटा.

# methi besan bhajiya recipe in mararthi

साहित्य :

40 ते ५० ग्राम मेथी (बारीक चिरलेली)

3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या

२ कप बेसन

१ कप रवा

१ टीस्पून लाल मिरची पाउडर

१ टीस्पून हळद पाउडर

१/२ टीस्पून हिंग

१/२ कप कोथिंबीर बारीक चिरलेली

4 काळे मिरे

1 टीस्पून धने

चिमूटभर बेकिंग सोडा

१/२ टेबलस्पून गरम तेल (मोहनसाठी)

तळण्यासाठी तेल

मीठ चवीनुसार

कृती :

स्टेप १: प्रथम एका पसरट भांड्यात बेसन ,रवा, हिरवी मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, कुटलेले जाडसर काळे मिरे ,धने जाडसर पोळपाटावर वाटलेले ( मिक्सर मध्ये वाटले तरी चालेल), हींग, चिमूटभर खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ टाकून साऱ्या वस्तुंना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.  




स्टेप 2: त्याच भांड्यात थोडे थोडे पाणी घालून वरील मिश्रणाचे घोळ तयार करा. जास्त घट्ट पण नको किंवा पातळ पण नको. तयार केलेल्या घोळ मध्ये थोडे गरम तेल टाकून मिक्स करा.

 



स्टेप 3: एका कढईत गॅसच्या मंद आचेवर तेल गरम करा . हात किंवा चमच्याच्या मदतीने एक एक करून मेथी ना गोटा च्या घोळला गरम तेलात हळू सोडा. गॅस च्या मंद आचेवर मेथी ना गोटयाला सोनेरी होई पर्यंत तळा.

स्टेप ४: खूप उत्कृष्ट आणि  स्वादिष्ट मेथी ना गोटा  मेथीचे पकोडे तयार आहेत.ज्याला तुम्ही सकाळी, किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात, हिरव्या ,लाल चटणी किंवा कढी सोबत सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments