Badam Nankhatai recipe in marathi -

बिना ओव्हन  टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत बदाम नानखटाई 


# nankhatai recipe in marathi

# badam nankhatai recipe

नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत  आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने  तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता.बिना ओवन,  कढईत,  कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो

पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण  वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीतल बदाम नानखटाई बनवू या.

साहित्य :

१०० ग्राम मैदा

४०  ग्राम रवा

६० ग्रॉम साखर(आपल्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता)

७० ग्राम साजूक तुप

1/2 टिस्पुन बेकिंग पावडर

1 टिस्पुन वेलची पावडर

चविनुसार मिठ

आवश्यकतेनुसार बदामाचे पातळ काप

  कृती :

स्टेप १: प्रथम एका भांड्यात किंवा ताटात साजूक तुप आणि पीठी साखर घेऊन मिश्रण चांगले एकत्र फेटून घ्यावे.किंवा साखरेची मिक्सर मध्ये पावडर करा त्यातच तुप टाकुन फिरवून  घ्या त्यातच वेलची पावडर ही टाका.  अगदी पांढरेशुभ्र फेसाळ झालं की त्या फेटलेल्या मिश्रणात, मैदान,  रवा, बेकिंग सोडा आणि बदामाचे काप घालून हाताने हलकेच हाताने कणिक मळून गोळा बनवा . थोडे बदामाचे काप नानखटाईला वरून लावायला बाजूला काढुन ठेवा.





स्टेप २
: कणकेचा गोळा ५-६ मिनीटे झाकून ठेवावा. कणकेचे छोटे छोटे गोल गोळे बनवून वरून  हाताने प्रेस करून  आपल्याला पाहिजे तसा आकार देऊन त्यावर बदाम लावून नानखटाई तयार करावी . 


स्टेप ३: त्या नंतर एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावी. कढईमध्ये खाली जाळीचे स्टँड ठेवून ठेवून त्यावर ती ताटली ठेवा.  त्या ताटलीत नानखटाईचे तयार केलेले गोळे  मंद, बारीक गॅसवर ठेवून  २० ते २५ मिनिटे नानकटाई बेक करून घ्या. 


स्टेप ४: या प्रकारे स्वादिष्ट नानकटाई खाण्यासाठी तयार आहे.



Post a Comment

0 Comments