Nachni satwa nankhatai recipe-

बिना ओव्हन स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीत नाचणी सत्व नानखटाई-

# nachni satwa nankhatai recipe

# nachni nankhatai recipe in marathi

नाचणी सत्व बनवितांना नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. मोड आले कि सावलीत वाळवावी आणि दळून आणावी. ते झाले नाचणी सत्व तयार. नाचणी सत्त्वाचाच बहुउपयोगी पिठामध्ये वापर करून हलवा, बिस्कीट, बर्फी तसेच गोड लापशी बनवता येते.

नाचणी पीठ मैद्यात मिसळून त्यापासून बेकिंग ओव्हनमध्ये बिस्किटे तयार करता येतात. नाचणी टाकल्यामुळे बिस्किटांच्या चवीला व रंगाला काहीही फरक न पडता उलट त्यांचा रंग आकर्षक होतो.

नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो.

पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत नाचणी सत्वाची नानखटाई बनवू या.

साहित्य :

4 टेबलस्पून मैदा

3 टेबलस्पून नाचणी सत्व

1 टेबलस्पून रवा

4 टेबलस्पून पिट्ठी साखर(आपल्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता)

1 कप साजूक तुप

1/2 टिस्पुन बेकिंग पावडर

1 टिस्पुन वेलची पावडर

चविनुसार मिठ

आवश्यकतेनुसार बदामाचे पातळ काप

नानखटाई वर लावण्यासाठी किसमिस

कृती :

स्टेप १: प्रथम एका भांड्यात किंवा ताटात साजूक तुप आणि पीठी साखर घेऊन मिश्रण चांगले एकत्र फेटून घ्यावे.किंवा साखरेची मिक्सर मध्ये पावडर करा त्यातच तुप टाकुन फिरवून घ्या त्यातच वेलची पावडर ही टाका. अगदी पांढरेशुभ्र फेसाळ झालं की त्यात फेटलेल्या मिश्रणात, मैदा, नाचणी सत्व रवा, बेकिंग सोडा आणि बदामाचे काप घालून हाताने हलकेच हाताने कणिक मळून गोळा बनवा.



                                       



स्टेप २: कणकेचा गोळा ५-६ मिनीटे झाकून ठेवावा. कणकेचे छोटे छोटे गोल गोळे बनवून वरून हाताने प्रेस करून आपल्याला पाहिजे तसा आकार देऊन त्यावर किसमीस लावून नानखटाई तयार करावी.


स्टेप ३: त्या नंतर एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावी.कढईमध्ये खाली जाळीचे स्टँड ठेवून त्यावर ती ताटली ठेवा. त्या ताटलीत नानखटाईचे तयार केलेले गोळे मंद, बारीक गॅसवर ठेवून २० ते २५ मिनिटे नानखटाई बेक करून घ्या.



स्टेप ४: स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीत नाचणी सत्व नानखटाई खाण्यासाठी तयार आहे.




Post a Comment

0 Comments