Brown rice corn healthy pancake recipe -

 चीझी बटर ब्राउन राइस कॉर्न, ज्वारीच्या लाह्यांची पौष्टिक पॅनकेक-


# Brown rice corn healthy pancake recipe 
# healthy pancake recipe 

पॅनकेक जगभरातील बर्‍याच संस्कृती मध्ये  प्रसिद्ध डिश आहे, जी एक प्रकारची सपाट ब्रेड किंवा साधा केक आहे, जो गोड किंवा तिखट  असतो .  आपण भारतात डोसा, आणि महाराष्ट्रात धिरडे म्हणू  शकतो. 

पॅनकेक रेसिपीत पिठ, अंडी आणि दूध हे मूलभूत खाद्य पदार्थ असतात. अमेरिका आणि कॅनडासारख्या काही देशांमध्ये, पॅनकेक्स न्याहारी म्हणून दिले जातात, युरोपमध्ये इतर काही देशांमध्ये पॅनकेक्स रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून खातात, 

(आकारानुसार, थोडेसे अधिक किंवा कमी) तयार करू शकता. आपण अतिथींच्या संख्येनुसार अन्नपदार्थांचे प्रमाण घेतात. 

तर चला तर आज करूयात चीझी बटर ब्राउन राइस कॉर्न, ज्वारीच्या लाह्यांची पौष्टिक पॅनकेक

साहित्य:-

५ टेबल स्पून ब्राउन राइस 

५ टेबल ज्वारी लाह्या 

४ टेबल स्पून ताजे कॉर्न वाफविलेले

२टेबल स्पून कांदा बारीक चीरलेला 

२ टेबलस्पून पानकोबी बारीक चिरलेली 

५ चीज स्लाइस 

1 टीस्पून बटर 

१० पाकळ्या लसुन 

१०ते १२ पाने कडीपत्ता 

१टीस्पून जीर, 

हिरवी मिरची आवश्यकतेनुसार 

१/२ टीस्पून मिरे पाउडर 

मीठ चवीनुसार 

पाणी आवश्यकतेनुसार

5 टीस्पून तेल

कृती:-

स्टेप १: प्रथम ब्राउन राइस धुऊन घेउन २तास भिजत घालावे. वाफवलेले कॉर्न लसुन, जीरे, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता ज्वारीच्या लाह्या , ब्राउन राइस पाण्यातून काढून मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्यावी.आवश्यकतेनुसार पाणी घालावे. तयार मिश्रण भांड्यात.काढून घ्यावे. त्यानंतर पानकोबी, कांदा बारीक चिरुन  तयार मिश्रणात टाकावे.



                                     

आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, बटर  व मिरे पावडर टाकावे आणि एक मिक्स करुन घ्यावे. खूप घट्ट नको आणि पातळही नको. तव्यावर जास्त न पसरता राहिले पाहिजे. 

स्टेप २: आता तवा गरम करायला ठेवून मध्यम गरम झाल्यावर तेल टाकावे.व साधारण जाडसर मिश्रण पसरवावे व त्यावर चीझ स्लाइस ठेवावे आणि त्यावर परत मिश्रण टाकून पसरवणे .चीझ स्लाइस ला मिश्रणाने झाकणे. साईडने थोडे तेल टाका झाकण ठेवुन शिजवा










मिश्रण जाडसर असल्याने जाड  झाकण ठेवून २ मिनीट शिजवावे. व परतवून घ्यावे.आता दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून शिजवून घ्यावे. खरपूस  होईपर्यंत शिजवा. 

स्टेप ३: तयार आहेत आपले पौष्टिक, चविष्ट  आणि पौष्टिक पॕनकेक लोणचं किंवा, दही आणि  साॕस सोबत गरमागरम खायला द्यावे.





Post a Comment

0 Comments