turichya danyachi kachori recipe in marathi-
विदर्भ हिवाळा स्पेशल तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी:
kachori recipe
turichya danyachi kachori
turichya danyachi kachori recipe in marathi
hirvya turichya danyachi kachori
olya turichya danyachi kachori
प्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. पावसाळ्यात रानभाज्या, उन्हाळ्यात आंबा, कैरी डाळ चटणी हिवाळा आला की विदर्भात तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळायला लागते.
हिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, चटणी , सोले वांगे, सोले भात, दाणे घालुन फोडणीची खिचडी, तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.
आज आपण करूयात एक अशीच भन्नाट रेसिपी तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी.
ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात पण आयते सोललेले तुरीचे दाणे मिळाले तर कचोरी एकदम झटपट आणि कचोरी खाऊन संपते ही पटपट.
साहित्य :
१ पाव तुरीच्या हिरवे शेंगेचे ओले दाणे.
हिरवी मिरची -लसूण जिरे, जाडसर वाटलेले १ १/2 टेबलस्पून (हे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे घ्यावे)
तिखट,मीठ-धनेपुड-प्रत्येकी १ टीस्पून.
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल,मोहोरी-जिरे-हिंग-हळद
कचोरी तळण्यासाठी तेल
कचोरी साठी ....
२ १/२ वाट्या कणिक.
चवीपुरते मीठ,
१/२चमचा मोहनसाठी तेल
पाणी
कृती :
स्टेप १:प्रथम तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घ्यावे. हे दाणे कुकरच्या भांड्यात किंवा स्टीम कुकरमध्ये १० ते १५ मिनिटे वाफवून घेणे.हे दाणे
स्टेप २: हे दाणे मिक्सर मधुन एकदा भरडुन घ्यावे. लसुण्, हिरवी मिरची वाटुन घ्यावी.
स्टेप ३: पॅनमधे तेलाची फोडणी करुन त्यात हिंग-मोहोरी-जिरे घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा ,लसूण-जिरे मिरची परतून घ्या.लाल तिखट, हळद त्यावर तूरीच्या डाळीचे वाटलेले मिश्रण, मीठ कोथिंबीर हे मिश्रण छान ढवळुन- परतून घ्यावे. पॅन वर झाकण ठेवुन १० मिनिट गॅसच्या मंद आचेवर ठेऊन अधून मधून परतून घ्या नंतर गॅस बंद करा व मिश्रण थंड करण्यासाठी ठेवावे.
स्टेप ४: आता कणिक मीठ व तेल घालुन घट्ट भिजवुन , मळुन घ्यावी.या गोळ्याच्या लहान लहान पुर्या लाटाव्या. किंवा पोळपाटावर एक मोठी थोडी जाडसर पोळी लाटून वाटीने पुऱ्या पाडाव्यात. एका पुरीत एक एक चमचा सारण भरुन , कचोरीचा आकार द्यावा. अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या तयार करा.
स्टेप ५: नंतर कढईत तेल गरम करावे .गॅस कमी करुन या तेलात कचोर्या मंद आचेवर दोन्हीकडुन तळाव्यात. कणकेच्या गोळ्याची पाती असल्याने असल्याने लगेच तळली जाते.अशा रीतीने सगळ्या कचोर्या तळुन घ्याव्या.
हिरवी चटणी,चिंचेची आंबट-गोड चटणी , दह्यासोबत गरमागरम खायला द्यावी.
0 Comments