Brown rice and bajari mung dal khichadi-

ब्राउन राइस, बाजरी मूंग दाल सात्विक, पौष्टिक, गरमागरम साधी खिचडी,आणि तूप :

                              
# brown rice khichadi recipe
# khichadi recipe in marathi

पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.

बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते. 

बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी तर शक्तीवर्धक व पोषक आहे.

मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.

तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची ( ब्राउन राइस, बाजरी, मूग डाळ ) सात्विक, पौष्टिक स्वादिष्ट, रूचकर, गरमागरम साधी खिचडी,आणि तुपाचा आस्वाद घेऊयात.

साहित्य :

१ वाटी, ब्राउन राईस

१/२ वाटी बाजरी

१/२ वाटी सालीची मुंग डाळ

२ छोटे चमचे जिरे

मीठ चवीनुसार

तूप

१ छोटा चमचा हळद

कृती :

स्टेप 1: प्रथम ५ तास बाजरीला पाण्यात भिजू घालणे दुसऱ्या वाटीत सालीसकट मुंग डाळ २तास भिजविणे.अर्धी वाटी, ब्राउन राईस २ तास पाण्यात भिजविणे.




स्टेप २: कुकरच्या भांड्यात १छोटा चमचा तुप, १छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा हळद, भिजविलेला ब्राउन राईस, बाजरा,मुंग डाळ घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे आणि आवश्यक तेवढे पाणी टाका.पाणी थोडे जास्त टाकावे लागेल पातळ खिचडी खायला चांगली लागते.

नंतर कुकर मधे पाणी तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका. कुकरची जाळी ठेवा. त्यानंतर त्या जाळीवर आपण तयार केलेले कुकरचे खिचडीचे भांडे ठेवणे. कुकरचे झाकण बंद करून खिचडी शिजू दयावी. खिचडी मंद आचेवर शिजवून घ्या. कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या होऊ द्या. गॅस बंद करून कुकर थंड झाला .


स्टेप ३:  हि गरमागरम खिचडी साजूक तुपासोबत खावी.




Post a Comment

0 Comments