जेवणाची चव वाढविणारी पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी :





#पौष्टिकआहाररेसिपीSwati'sKitchen
#पेरूभाजी
#भाजी
#Swati'sKitchen
पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास "जाम' किंवा "अमरूद' असेही संबोधले जाते.   

पेरूमध्ये असंख्य औषधी गुणधर्म असतात.पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्व असते. ‘क’ जीवनसत्त्वामुळे पेरू खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते पण, त्यातल्या बिया दातात अडकून बसणं हा सगळ्यात जास्त त्रासाचं असल्यानं अनेक जण पेरूच्या वाट्याला जात नाहीत. पण आज आपण पेरूच्या सालासकट आणि बियांसहित जेवणाची चव वाढविणारी पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी बनविणार आहोत.

साहित्य :

३ मोठ्या आकाराचे मध्यम पिकलेले पेरू
१ लसून पाकळ्या बारीक तुकडे केलेले
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
१/४ टिस्पून हिंग
१टिस्पून चमचे जिरे
१/२ टिस्पून मोहरी
१ ते दीड टेबलस्पून चमचे तेल
चवीनुसार मीठ
दीड टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून चमचा गरम मसाला
१ टेबलस्पून गुळ किसलेला
१/4 चमचा हळद
कोथिंबीर
2 टेबलस्पून पाणी

कृती :

स्टेप १ - बिया सह पेरू चौकीनी मध्यम आकारामधे तुकडे करून घ्या.



स्टेप २ - कढईत तेल गरम करा. मोहरीची दाणे आणि जिरे घाला. हिंग घाला. त्यानंतर त्यात लसूण कांदा घालुन परतुन घ्या.



स्टेप ३ - चिरलेले पेरू, हळद, तिखट ,गरम मसाला आणि मीठ आणि गुळ घाला,2 टेबलस्पून पाणी घाला.चांगले मिसळा.त्यात ,कोथिंबीर घाला आणि छान मिक्स करा.


स्टेप 4 - मध्यम गॅस करा त्यावर झाकण ठेवा ४ - ५  मिनिटे शिजवा. आणि नंतर गॅस बंद करा.पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी  पोळी सोबत सर्व्ह करा.




 


Post a Comment

0 Comments