विदर्भ स्पेशल पौष्टिक, चटपटीत, तिखट मुंग डाळ कटलेट :-
सर्व डाळींमध्ये मूग डाळीला आरोग्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाते. मोठ्या प्रमाणात प्रोटीन असलेली ही डाळ पौष्टिक गुणांनी भरपुर असते. तर चला आज आपण करूयात पौष्टिक गुणांनी भरपुर मूंग डाळीचे कटलेट( विदर्भ स्पेशल मुंग डाळीचे वडे ).
मी विदर्भ स्पेशल मुंग डाळीचे वडे का म्हटले असेल. कारण विदर्भात बहुतेक सणाला म्हणजे महालक्ष्मीला, पितृ मोक्ष अमावस्याला हातावर थापलेले तिखट ,चटपटीत मूंग वडे आणि ताकाची कढी नैवैद्य म्हणून ठेवला जातो. आजच्या आधुनिक भाषेत मूंग डाळीच्या वड्याला मूंग डाळीचे कटलेट म्हणूयात.
साहित्य :-
६टेबल स्पून मुग डाळ (रात्रभर भिजवुन ठेवलेली).
७ते ८पाकळ्या लसुन
२ टेबल स्पून कापलेली कोथींबीर.
१ टीस्पून जिरे.
2 टीस्पून धने पावडर
५ते६ मिरच्या.
१ कापलेला कांदा.
७ते ८पणे कढीपत्त्याची
१/२ टीस्पून हींग
स्वादानुसार मिठ.
तळायला तेल.
कृती :-
स्टेप १ - सर्व प्रथम मुग डाळ पाण्याने धुवून घ्या व मिक्सर मध्ये जाडसर वाटा . जास्त बारीक करू नका. त्यात कांदा बारीक कापलेला, जिरं, मिरच्या,लसुन पाकळ्या कोथिंबीर मिक्सर मध्ये जाडसर वाटलेला हळद, कढीपत्त्याचे पाने बारीक चीरलेली व चविनुसार मिठ घालून मिश्रण हाताने कालवावे. सोबत थोडं कढईत गरम केलेलं तेल घाला यामुळे वडे कुरकुरीत होतील.
स्टेप २ - त्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन कटलेट तळहातावर थापावे.कढईत तेल गरम झाल्यावर कटलेट गॅसच्या मंद आचेवर त्यात चांगले सोनेरी होईपर्यंत तळुन घ्या.
स्टेप ३ -आणि गरमागरम कटलेट ताकाच्या कढीसोबत किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खायला द्या.
0 Comments