Tasty papad chat recipe-

झटपट,फटाफट भाजलेला तांदूळ, बटाटा पापड पौष्टिक, टेस्टी चाट रेसिपी :


# tasty papad chat recipe

# papad chat recipe

आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. भाजलेला  तांदूळ  आणि बटाटा पापड चाट रेसिपी १५ ते २० मिनिटात होणारी सोपी आणि झटपट होणारी टेस्टी व पौष्टिक रेसिपी आहे. विविध  प्रकारचे पापड हा एक सर्वांच्या घरात भरलेला झटपट नाश्त्याचा प्रकार आहे. याला उन्हाळी वाळवणाचे पदार्थ म्हणतात. 

आपल्याला आवडेल अशी  ही भाजलेल्या पापडाची  चाट पाककृती आहे. भाजलेला पापड चाट तयार करण्यासाठी साहित्य .

साहित्य :

तांदूळ पापड, बटाटा पापड प्रत्येकी ६ पापड सर्व मिळून १२ पापड. तुमच्याकडे जे पापड असतील ते भाजून  घेणे. 

१ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे  

१ टेबलस्पून फुटाणे सालासहित किंवा बिना सालाचे 

१ मोठा टोमॅटो बारीक चीरलेला 

१ मोठा कांदा  बारीक चीरलेला

२हिरव्या  मिरच्या बारीक चिरलेल्या

१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली

मीठ  चवीनुसार 

लाल तिखट चवीनुसार 

१ लिंबाचा रस

चाट  मसाला चवीनुसार

स्टेप १: पापड गॅसवर  किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये भाजून घ्या आणि लहान तुकडे करा किंवा मिक्सर च्या पॉट मधुन एकदाच फिरविणे. जास्त बारीक करू नये. 


स्टेप २: पुढे एका मोठ्या एका ताटात भाजलेले शेंगदाणे, फुटाणे सालासहित किंवा बिना सालाचे, टोमॅटो १ मोठा बारीक चीरलेला, कांदा १ मोठा बारीक चीरलेला, हिरव्या  मिरच्या २ बारीक चिरलेल्या, कोथिंबीर १ मोठा चमचा बारीक चिरलेली, मीठ  चवीनुसार, लाल तिखट चवीनुसार, १ लिंबाचा रस, चाट  मसाला चवीनुसार मिक्स करावे. आणि शेवटी भाजून आणि छोटे छोटे तुकडे केलेले तांदूळ आणि  बटाटा पापड घालून मिक्स करावे. 

                                  

                                        

                                        

                                       

हे त्वरित सर्व्ह करा अन्यथा पापड हळूहळू मऊ होतील.

Post a Comment

0 Comments