ढोबळी  मिरचीचा(सिमला मिरचीचा) झणझणीत, खमंग पौष्टिक झुणका  आणि नाचणी सत्वाची भाकरी:-



झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी झणझणीत,खमंग, पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. ह्या झुणक्याला ढबू मिरचीची पीठ पेरून केलेली भाजी पण 

म्हणतात. ढोबळी मिरचीचा  झुणका ही रेसिपी बनविण्यासाठी खूप सोपी आहे. झुणका हि डिश लंच बॉस साठी खूप लवकर होणारी पौष्टिक आणि स्वादिष्ट खमंग भाजीचा प्रकार आहे.

साहित्य:-

१ वाटी बेसन

५ ढोबळी मिरची (सिमला मिरची) बारीक चिरलेली 

१ मोठा कांदा बारीक चीरलेला 

१ मोठा चमचा बारीक कापलेला लसूण 

१ लहान चमचा जिरे 

१ लहान चमचा मोहरी

१ छोटा अर्धा चमचा हिंग१ 

३ छोटे चमचे  लाल तिखट चवीनुसार 

१ छोटा चमचा हळद 

अडीच मोठे चमचे तेल 

मीठ चवीनुसार 

कृती:-  

 स्टेप १ - १ वाटी  बेसन थोडे तेल न टाकता भाजून घेणे. म्हणजे झुणका कच्चा लागत नाही .

स्टेप २ - एका कढईत तेल टाकून गरम मंद आचेवर  गरम करायला ठेवा. त्याच तेलात मोहरी ,जिरे टाका. तडतडू द्या .त्या नंतर त्यात लसूण, कांदा टाकून  लालसर परतून घ्या.

स्टेप ३ - त्यानंतर त्यात  हिंग, हळद, तिखट, मीठ  टाकुन मिक्स करा.त्यात बारीक कापलेली सिमला मिरची टाकून परतून घ्या.

स्टेप ४ - दिड मोठा चमचा गरम पानी आवश्यकतेनुसार  टाकून झाकण  ठेऊन अर्धी  कच्ची शिजवून घ्या.पाणी पातळ बेसना प्रमाणे टाकू नका. झाकण उघडून त्यात थोडे थोडे बेसन टाकून चांगले मिक्स करा.



स्टेप ५
- कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर १५  ते २० मिनिटे ठेवा. मधे थोडे उघडून बघा. अधून मधून झुणका परतत जा. नाहीतर झुणका करपेल.

स्टेप ६ - २०मिनिटाने गॅस बंद करा. कोथिंबीर मिक्स करा.आपला झणझणीत झुणका तयार झाला. गरमागरम झुणका भाकरी सोबत वाढा.





Post a Comment

0 Comments