मेथीच्या भाजीचे आणि  ताकाचे महाराष्ट्रीयन टेस्टी आंबट बेसन / आंबट पिठलं :

#पौष्टिकआहाररेसिपीपौष्टिक

#पश्चिममहाराष्ट्र

#आंबटबेसनआंबटपिठलं 

मी ताकाचे आंबट बेसन नेहमी करते . पण माझ्या पतीदेवांची आज फर्माईश होती की मेथी घालून ताकाचे बेसन ( पिठलं ) कर . मी थोडी अचंबित झाले ताकाच्या बेसनात मेथी कशी घालू. कारण मी आतापर्यंत मेथी टाकून साधे बेसन केले होते. पण आज पतीदेवांची फर्माईश पूर्ण करायची होती  म्हणून मनाला घट्ट करून  आज मेथीची भाजी टाकून ताकाचे बेसन केले. काय सांगु खूप टेस्टी झाले. मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ? ते हे असते.💐💐  मेथी घालून केलेले  ताकाचे बेसन. मेथीच्या भाजीचा स्वाद ताकाच्या बेसनाला वेगळीच खुमारी आणते.

साहित्य :

१ कप बेसन

११/2  कप आंबट दही

३ टेबलस्पून मेथीची भाजी चिरून किंवा पाने खुडून घ्यावीत.

६ ते ७  कडीपत्ता

७ ते ८लसुन पाकळ्या बारीक चिरलेले

५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

 1टेबलस्पून बारीक चिरलेला कोथिंबीर

1 टीस्पून तिखट हळद 

१ टीस्पून जिरे 

१ टीस्पून मोहरी

मीठ चवीनुसार

पाणी

१ टेबलस्पून तेल 

कृती: 

स्टेप १ - प्रथम मेथीची भाजी चिरून किंवा पाने खुडून घ्यावीत. मिक्सरच्या जार मध्ये बेसन, दही आणि पाणी टाकून मिक्स करून घ्या आणि बाजूला ठेवा किंवा बेसन , दही  आणि पाणी  एका भांड्यात  टाका आणि  रवीने मिक्स करून घ्या.

स्टेप २ - एका कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी तडतडू द्या. नंतर लसूण, कढीपत्ता हिंग , हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या.आता त्यात  हळद  मीठ टाकून मिक्स करून घ्या.


स्टेप ३ - लगेच ताक आणि बेसनाचे मिश्रण त्यात घालावे. नीट हलवून लागेल त्याप्रमाणे पाणी घालावे आणि उकळी आणावी. शिजवताना मधून मधून चमच्याने हलवत रहा जेणेकरून बुडी लागायला नको याची काळजी घ्या. बेसन शिजवून झाल्यावर  त्यात वरून मेथीची भाजी टाकून मिक्स करा. नंतर कोथिंबीर टाका.




स्टेप ४ - मेथीच्या भाजीचे आणि  ताकाचे महाराष्ट्रीयन टेस्टी आंबट बेसन / आंबट पिठलं तयार. आहे......गरम भाकरी ,पोळी किंवा भातासोबत सोबत सर्व्ह करा.




     

Post a Comment

0 Comments