दही लसणाच्या गरम-गरम ,खमंग ,खुसखुशीत चकल्या :

दिवाळीतील आवडीचा पदार्थ म्हणजे  सर्वांचा चकली ! महाराष्ट्रात अनेक प्रकारे चकली बनवली जाते. खमंग आणि खुसखुशीत असणारा हा पदार्थ  सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.

साहित्य :

1/2 किलो चकलीची भाजणी

200 ग्रॅम आंबट दही

2 टीस्पून लसूण जिरे पेस्ट

३ टीस्पून तिखट

2 टीस्पून हळद

3 टीस्पून तीळ

2 टीस्पून धणे पूड

2 टीस्पून मीठ

१/ टीस्पून हिंग 

1टेबलस्पून गरम तेलाचे मोहन

1 ग्लास पाणी

तळण्यासाठी तेल

कृती :

स्टेप १ - सर्वप्रथम एका परातीत चकलीचे भाजणी पीठ , लसूण जिरे पेस्ट, तेल, हिंग ,तीळ आणि  मीठ  हे सारे मिश्रण एकत्र करा.यामध्ये आंबट दही आणि थोडेसे पाणी मिसळून त्या पीठाचा गोळा बनवा. मिक्स केल्यानंतर त्याला थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.त्याचे छोटे छोटे लांब गोळे करून घ्यावे.




स्टेप २ - एकीकडे कढई गॅसवर ठेवावी व त्यात तेल तापू द्यावे. लांब तयार केलेले गोळे चकलीच्या साच्यात भरावे व चांगल्या प्लास्टिक पेपर वर गोल अशा आकारात चकल्या तयार कराव्यात. आणि  एकेक चकली हातात घेऊन  ति कढईत सोडावी.खरपूस अशी तळून झाल्या नंतर टिशू पेपरवर ठेवावी.



 स्टेप ३ - अशाच सगळ्या चकल्या तळून घ्याव्यात.गरम-गरम ,खमंग खुसखुशीत चकल्या तयार आहेत.  तयार चकल्या दीर्घकाळ कुरकुरीत राहण्यासाठी एअर टाईट डब्ब्यात ठेवा.



Post a Comment

0 Comments