दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी:
#पौष्टिकआहाररेसिपी
#मैदा
#फ्राईड
#मिठाई
#डोनट
डोनट पाहिले की मेदूवडा आकारात आणि साखरेच्या पाकातील पुऱ्यांची , शंकरपाळ्यांच्या टेस्टची आठवण येते.
डोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइड केक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किं फ्राईड केक स्नॅक्स म्हणायचे. डोनट हे खरेतर अंडी आणि यीस्ट वापरूनच केले जातात. पण आज अंडी ,यीस्ट ना घालता बदाम ,काजू डोनट बनवू या.
आज मी बदाम, काजू डोनट्स एक मैदा,आणि साखरेच्या पाकापासून तयार केली आहे. चविष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. कुरकुरीत आणि साखरेच्या पाकातील हे डोनट तुमच्या घरातील लहान मुलांनाही खायला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी .
साहित्य :
2 वाटी मैदा
2 वाटी साखर
1 वाटी दही
1/2 वाटी साजूक तूप
चिमुटभर सोडा
चिमूटभर मीठ
थोडसं पाणी
तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती :
स्टेप १- मैदा चाळून ताटात घ्या. त्यामध्ये सोडा, साजूक तूप व दही मिक्स करून मळून घ्या गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या.५ ते १० मिनिटे कणिक मुरु द्या.
स्टेप २- नंतर त्याचे मोठे ३ गोळे बनवून घ्या. पोळपाटावर एका गोळ्याची मोठी पोळी पातळ लाटून घ्या आणि त्या पोळीवर छोट्या वाटीच्या साहाय्याने पुरीसारखे गोल आकार कापून घ्या.मध्ये होल पाडून घ्या.
स्टेप ४- एका कढई मध्ये तेल किंवा तूप गरम करून डोनट तळून घ्या.. पुर्या टिश्यु पेपरवर काढाव्यात. २-४ मिनीटांनी पाकात डोनटस टाका. काही मिनीटे मुरू द्या. नंतर ताटात पाघळवत ठेवावे.
स्टेप ५- पाकातल्या डोनटवर बदाम आणि काजूचे काप किंवा बदाम काजूचे जाडसर कुट टाकून सजवावे. हे डोनट पक्वान्नं म्हणून जेवणात वाढता येतात.
















0 Comments