अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी ( बटर मिल्क ) ताकाच्या बेसन वड्या (टिफिन रेसिपी ) :
#पौष्टिकआहाररेसिपी
#पश्चिममहाराष्ट्
#विदर्भ
#बटरमिल्क
#बटरमिल्कबेसनवड्या
#ताकबेसनवड्या
कुठे बाहेरगावी जत्रेला ,सहलीला जायचं म्हटलं तर ताकाच्या बेसन वड्या आठवतात कारण प्रवासात इतर भाज्या आपण बॅगमध्ये ठेवताना कुठे भाजीतले तेल बॅग मधून निघते ठेवतांना खूप त्रास होतो . पण हि ताकाच्या बेसन बेसन वड्या अगदी कोरडया राहतात. ह्या वड्यातून न तेल बाहेर येत न कशाला डाग लागत नाही.
तर चला आज बनवुयात टिफिन रेसिपी अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी ( बटर मिल्क ) ताकाच्या बेसन वड्या.
साहित्य:
३ कप बेसन
2 कप दही
२ टेबलस्पून तेल
6 हिरव्या मिरच्या चिरून
१० ते १२ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
10 ते 12 कढीलिंबाची पाने
1 टीस्पून जिरे आणि मोहरी
1 टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
2 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
पाणी अवश्यकतेनुसार
कृती :
स्टेप १ - प्रथम एका भांड्यात दह्यात २ कप पाणी घालून घुसळुन घ्या (पाणी घाला पातळ व्हायला नको ) आणि आणि त्यात बेसन पीठ हळद आणि मीठ एकत्र करून घ्या .छान मिक्स करा .त्यामध्ये तिखट ,हळद मीठ टाका.थोडं पाणी घाला पातळ व्हायला नको
स्टेप २ - त्या नंतर कढईत तेल टाकून गरम होऊ द्या. त्या गरम तेलात मोहरी, जीरे हिंग,लसुन परतून घ्या. मिरच्या टाका थोडं अरत परत करा आणि मिक्स केलेलं ताक बेसन फोडणीत टाका.मिक्स करा कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून २० मिनिट शिजू द्या .
स्टेप ३ - एका प्लेटला तेलाने ग्रीसिंग करा .शिजलेला बेसनाचा गोळा प्लेटमध्ये टाकून थापून घ्या. थापलेल्या बेसनवर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरऊन घ्या व थंड होण्यासाठी ठेवा.














0 Comments