दिवाळी विशेष कुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम, काजू पुरी रेसिपी :
#पौष्टिकआहाररेसिपी
#पाकातल्यापुऱ्या
#दिवाळीविशेष
बदाम, काजू पुरी ही एक मैदा, आणि साखरेच्या पाकापासून तयार केली जाते. विशेषतः दिवाळी सणाच्या दिवशी या गोड फराळाचा बेत आखला जातो. हा चविष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. कुरकुरीत आणि साखरेच्या पाकातील ही पुरी तुमच्या घरातील लहान मुलांनाही खायला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
साहित्य :
२ वाटी मैदा
२ वाटी साखर
१ वाटी दही
अर्धी वाटी साजूक तूप
चिमुटभर सोडा
चिमूटभर मीठ
थोडसं पाणी
तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती:
स्टेप १- मैदा चाळून ताटात घ्या. त्यामध्ये सोडा, साजूक तूप व दही मिक्स करून मळून घ्या गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या.५ ते १० मिनिटे कणिक मुरु द्या.
स्टेप २- नंतर त्याचे मोठे ३ गोळे बनवून घ्या. पोळपाटावर एका गोळ्याची मोठी पोळी पातळ लाटून घ्या आणि त्या पोळीवर छोट्या वाटीच्या साहाय्याने पुरीसारखे गोल आकार कापून घ्या .
स्टेप ३- दुसरीकडे एका पातेल्यात २ वाटी साखर व त्यामध्ये साखर भिजेल एवढेच पाणी घालून आणि वेलचीचे दाणे घालून एकतारी पाक बनवून घ्या.
स्टेप ४- एका कढई मध्ये तेल किंवा तूप गरम करून पुऱ्या तळून घ्या.. पुर्या टिश्यु पेपरवर काढाव्यात. २-४ मिनीटांनी पाकात पुर्या टाकाव्यात. काही मिनीटे मुरू द्याव्यात. नंतर ताटात पाघळवत ठेवाव्यात.
स्टेप ५- पाकातल्या पुऱ्यांवर बदाम आणि काजूचे काप किंवा बदाम काजूचे जाडसर कुट पुऱ्यावर टाकून सजवावे. या पुर्या पक्वान्नं म्हणून जेवणात वाढता येतात.










0 Comments