हिमाचली स्टाईल भल्ले :

#उत्तरप्रदेश

#हिमाचलप्रदेश

# उडीदमुगाच्याडाळीचेभल्ले

चीत्तथरारक नैसर्गिक सौंदर्यासह आशीर्वाद देण्याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेशात देखील संस्कृती आणि परंपरा यांचे चवदार मिश्रण आहे. हिमा या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये हिमवर्षाव आहे. हिमाचली पाककृती आपल्याला त्याच्या प्रेमात पडण्याचे एकापेक्षा जास्त कारण आहे. त्यांच्या बर्‍याच डिशेस हळू-शिजवलेल्या असतात ज्यामुळे एक अनोखी चव आणि सुगंध मिळतो. हिमाचली स्टाईल भल्ले हा हिमाचल प्रदेशातील पारंपरिक  shallow-fry केलेला पदार्थ आहे.   हिमाचली भल्ले हे दहिवड्या सारखेच आहे पण डीप- फ्राय ना करता 

shallow-fry  केलेले असतात. पण हिमाचल प्रदेशात हा पदार्थ उडीद डाळीचा बनवितात. आज मी थोडा बदल करून हिमाचली स्टाईल भल्ले बनविण्यासाठी उडीद डाळी सोबत थोडी मुंग डाळ वापरली आहे. तर  चला आज हिमाचली स्टाईल भल्ले भल्ल्यांची रेसिपी जाणून घेऊयात.   

साहित्य:

 १ वाटी उडदाची धुतलेली डाळ

१ /२  वाटी मुगाची धुतलेली डाळ

1 टिस्पून जिरे

१टिस्पुन मीठ

3 वाळलेल्या लाल मिरच्या

२ मध्यम आकाराचे कांदे चिरलेले

७ -८ लसूण पाकळ्या

१ वाटी कोथिंबीर

1/2 टिस्पून तिखट

१ टिस्पून अख्खे धने

चिमूटभर हिंग 

तेल

कृती :

स्टेप१: सर्वप्रथम उडीद आणि  मुगाची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत घालायची. नंतर त्यातले पाणी कड  डाळ मिक्सर मध्ये वाटून घ्या. 



स्टेप २: चिरलेले कांदे, लसूण ,जिरे, ,लाल वाळलेली मिरची, धने, कोथिंबीर, हिंग मीठ एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्या. वरील वाटलेले मिश्रण वाटलेल्या डाळीत  मिक्स करून फेटून घ्यावे.

स्टेप 3:: डाळीचे मिश्रण चांगले फेटल्यानंतर एक फ्राय पण मध्ये थोडेसे तेल टाकून फेटलेल्या मिश्रणाला भल्याला एक एक करून चपटे आकारात फैलून द्या .हलके हलके मंद आचेवर शेकल्यानंतर भल्याला पलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या.



स्टेप ४: आता एका भांड्यात थोडे गरम पाणी करून घ्यायचे आणि त्यात थोडे मीठ घालून त्यात शॉलो फ्राय केलेले भल्ले टाकून  ५ मिनिटांनी पाण्याच्या बाहेर काढून हलक्या हाताने दाबून घ्या म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल. 


स्टेप ५: त्यानंतर भल्यांनवर साजूक तूप टाकून सर्व्ह करा किंवा वाटले तर टोमॅटो सॉस ,दह्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments