ढाबा स्टाईल (ग्रेव्ही) तिखट मसाला पनीर :

#पौष्टिकआहाररेसिपी

#ढाबास्टाईल

#पनीर

#ढाबास्टाईलग्रेव्हीतिखटमसालापनीर

पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो. तर चला आज आपण ढाबा स्टाईल (ग्रेव्ही) तिखट मसाला पनीर करूयात.

साहित्य:

२०० ग्राम पनीर

२ मोठे बारीक कापलेले कांदे

२ टोमॅटोची पेस्ट 

२ हिरव्या मिरच्या

1 टेबलस्पून अदरक लसुन पेस्ट

1 टेबलस्पून भाजलेले बेसन

२-३तेजपत्ता

३ लवंग

३ चक्री फुल

१ टीस्पून जिरे

५ काळे मिरे 

२  कप पानी,

२ टेबलस्पून साजूक तूप

१ टीस्पून हळद पाउडर

१ टीस्पून धने पाउडर

१टीस्पून गरम मसाला पाउडर

१ टीस्पून कस्तुरी मेथी 

बेडगी मिरचीचे तिखट तुमच्या चवीनुसार

चवीनुसार मीठ

कृती :

स्टेप १ - सगळ्यात पाहिले पनीर तुमच्या आवडत्या आकारात कापून तळून घेणे.



स्टेप २ - नंतर एक मोठी कढई  घ्या.त्यात दोन चमचे साजूक तुप टाकून गरम करा आणि ह्यात आता सगळे खडे मसाले ,हिरव्या मिरच्याचे मोठे तूकडे कापून १ मिनिट परतून भाजून घ्या. 


स्टेप ३ - त्यानंतर कांदा परतून घ्या .आता परत अदरक, लसुन , कोथिंबीर पेस्ट टाकून परतून घ्या.

  


स्टेप ४ - पुढे त्यात हळद, तिखट, धने पावडर , गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या.आता त्यात टोमॅटो पेस्ट टाकून मिक्स करा आणि १ मिनिट शिजवून घ्या .



स्टेप ५ - आता बेसन घालून परतून घ्याआणि त्यात मीठ आणि गरम पाणी घालून २ मिनिटे शिजवून घ्या. मसाला (ग्रेव्ही) आता तयार आहे . त्या मसाल्यात पनीरचे पीसेस टाकून थोड्या वेळ शिजवून घ्या . आता तयार आहे.






स्टेप ६ - ढाबा स्टाईल ( ग्रेव्ही) मसाला पनीर . कोथिंबीर टाकून सजवून घ्या. आणि गरमागरम ढाबा स्टाईल ( ग्रेव्ही) मसाला पनीर नान ,चपाती, पराठ्यासोबत सर्व्ह करा.






Post a Comment

0 Comments