चटपटीत Crispy मॅगी नूडल्स डोनट:

#पौष्टिकआहाररेसिपी

#डोनट

डोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइडकेक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किंवा फ्राईड केक म्हणायचे.  आज मी  थोडा वेगळेपणा आणून तिखट आणि चटपटीत Crispy मॅगी नूडल्स डोनट बनविले आहे. 

साहित्य :

२ मॅगी नूडल्स पॅकेट्स

१ टेबलस्पून टोमॅटो बारीक चिरलेले

१ टेबलस्पून कांदा बारीक चिरलेला 

१ टेबलस्पून सिमला मिरची बारीक चिरलेली

३ टेबलस्पून उकडलेला बटाटा कुस्करलेला

६ ते ७ लसुण पाकळ्या बारीक तुकडे केलेले

1 टीस्पून लाल मिरची पावडर 

३ ते ४ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे केलेले

२ पॅकेट मॅगी मसाला

१ टेबलस्पून कोथिंबिर बारीक चिरलेली

१ टीस्पून लाल मिरची पावडर 

१ हळद पावडर

१ टेबलस्पून तेल

१ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार 

२ टीस्पून मैदा किंवा तांदळाचे पीठ 

मीठ चवीनुसार

कृती :

स्टेप १ - प्रथम २मॅगी नूडल्स पॅकेट्स घ्या.नूडल्सला पाहिले हलकेसे कुस्करून घ्या. पावडर करू नका.नूडल्समधील दीड भाग बाजूला ठेवा आणि उरलेला अर्धा भाग डोनट्सवर कोटींग करण्यासाठी ठेवा.

स्टेप २ - गॅसच्या शेगडीवर एका पॅन मधे तेल घाला व गरम झाल्यावर जिरे लसुण कांदा व लालसर परतून  घ्या. त्यानंतर त्यात हळद तिखट, मॅगी मसाला, मिच्यांचे तुकडे सिमला मिरची, टोमॅटो, कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर  टाकून परतून मिक्स करून घ्या.त्यानंतर त्या मिश्रणात दीड भाग कुस्करलेले मॅगी नूडल्स टाकून १ मिनिट परतून घ्या आणि गॅस बंद करा.





स्टेप ३ - मिश्रण थंड झाल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करून गोळा तयार करा.हाताला थोडे तेल लावून तुम्हाला जितके मोठे किंवा छोटे डोनट पाहिजे तसे त्या आकारात गोळे बनवा. त्यातला एक गोळा घ्या. गोळ्याला मधून बोटाने मध्ये दाबून छिद्र करून घ्या. त्यानंतर एक प्लेट मध्ये मैदा आणि पाणी एकत्र करून पातळ मिश्रण तयार करा. आपण तयार केलेल्या डोनटला मैद्याच्या मिश्रणात बुडवुन घ्या आणि आपण बाजूला ठेवलेल्या कुस्करून ठेवलेल्या मॅगीत डोनट बुडवून वरून मॅगीचे आवरण लावून घ्या. अश्या प्रकारे सर्व डोनट तयार करा.


स्टेप ४ - नंतर कढईत मध्ये तेल तापवण्यास ठेवणे.तेल तापले कि तयार केलेले डोनट गॅसच्या मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेणे.व एका प्लेट मध्ये काढून घेणे.


स्टेप ५
- तयार झाले आपले गरमागरम Crispy मॅगी नूडल्स डोनट. टोमॅटो sauce सोबत सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments