मिसळाच्या पीठाची  (मिश्र धान्य पीठ),  आरोग्यपूर्ण  पौष्टिक चकली :

#रेसिपीबुक

#week15

#पौष्टिकआहाररेसिपी

चकली मिसळाचे पीठ म्हणजे (मिश्र धान्य पीठ ज्वारी, बाजरी, नाचणी, मूंग, उडीद, हरबरा, मटकी (सालासहित)) , मेथी दाना आरोग्यपूर्ण, पौष्टिक पीठ .ह्या पिठापासून भाकरी बनवितात. तर चला आज आपण मिसळाच्या पीठाचे (मिश्र धान्य पीठ ज्वारी, बाजरी, नाचणी, मूंग, उडीद, हरबरा, मटकी (सालासहित)) ,मेथी दाना आरोग्यपूर्ण, पौष्टिक चकली बनवू या.

साहित्य :

५ टेबलस्पून मिसळलाच्या भाकरीचे पीठ          

दीड टिस्पून  लाल मिरची पावडर

स्वादानुसार नमक

१ टेबलस्पून दहीं

१/२ टीस्पून हळद पावडर 

1टेबलस्पून चम्मच तीळ

१/४ टिस्पून हींग

१ टिस्पून जीरे, लसूण पेस्ट

1 टेबलस्पून तेल पिठात घालण्यासाठी

आववश्यकतानुसार  तळण्यासाठी तेल

कृती :

स्टेप १ - प्रथम ज्वारीच्या पिठात सर्व साहित्य घालून थोडे थोडे पाणी मिक्स करून गोळा बनवा.



स्टेप २ - चकलीच्या साच्याला तेल लावून गोळा भरून बटर पेपरवर किंवा प्लास्टिक पेपरवर चकल्या बनवा.


स्टेप ३-गरम तेलात चकल्या तळा. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणे. इन्स्टंट अशी मिसळाच्या पिठाच्या चकल्या खाण्यासाठी तयार आहे. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.






Post a Comment

0 Comments