मूग डाळ सूप:


#मूग डाळ सूप

#मूग 

काहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची  रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे. 

मूग पचायला हलका असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ  आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.

साहित्य :

१ वाटी मूग डाळ

७ कप पानी

1 टीस्पून हींग

1 टीस्पू जिरे

1 टीस्पून मिरे पूड

1 टेबल तूप किंवा बटर

5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या

१ कांदा अगदी बारीक केलेला

मीठ चवीनुसार

कृती :

स्टेप १ - सर्व प्रथम मुग डाळीला पाण्याने धुवून घ्या. 

 



स्टेप २ - त्या नंतर मुग डाळीला कुकरच्या भांड्यात डाळ शिजेल इतपत पाणी आणि त्यात हिंग टाकून कुकरचे झाकण बंद करून गॅसवर वर ठेऊन ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या .कुकर थंड झाल्यावर मुंग डाळीला रवीने घोटून घ्या.


स्टेप ३ - एकीकडे गॅसवर जाड बुडाचे भांडे ठेवा, त्यात तूप टाकून थोडे गरम करा आणि त्यात जिरे घालून तडतडू द्या  व बारीक लसूण टाकून परतून घ्या जास्त वेळ परतु नका. नंतर त्यात घोटलेली मुग वरणपेस्ट घालून मिक्स करा. त्यात  तुम्हाला घट्ट पातळ जसे सूप पाहिजे तसे पाणी व मीठ भांड्यात घालून एक उकळी येऊ देणे.





स्टेप ४ - नंतर गॅस बंद करून बारीक केलेला कांदा, मिरे, आणि जिरे पूड आणि बटर टाकून गरमागरम सूप सर्व्ह करणे.





Post a Comment

0 Comments