हिरवी कच्ची मेथी पनीर सलाद :
सलाद.खाणं आपल्या सर्वांनाच खूप आवडतं. मग सलाड फळांचं असो वा भाज्यांचं किंवा मग त्यात दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, दही घालून तयार केलेलं असो.मोसम कुठला पण असो सलाद खाण्याची मजा काही वेगळी असते असते. जर सलाद कलरफुल असेल तर सलाद खाण्याची तृष्णा अजूनही वाढते.
सलाद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. कारण सलाड हे फायबरने संपन्न असते. यात असणारी फळे आणि पालेभाज्या आपल्या शरीराला विविध प्रकारची अत्यावश्यक तत्व प्रदान करतात. यामुळे खाल्लेले अन्न नीट पचायला मदत होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत होते. फायबर युक्त असण्यासोबत आंबट फळे सायट्रिक अॅसिडने भरपूर असतात. यामुळे आपले पचन तंत्र आणि आतड्या साफ राहण्यास मदत मिळते. याशिवाय कमजोर झालेल्या त्वचेच्या अंतर्गत आणि बाह्य पेशी सुद्धा मजबूत होतात
तर चला आज आपण हेल्दी , चविष्ट हिरवी कच्ची मेथी पनीर सलाद तरी करूयात .
साहित्य :
२५० ग्राम पनीरला थोडे लालसर बारीक चौकन
आकारात कापलेले
२०० ग्राम हिरवीगार मेथी बारीक चिरलेली
१कांदा मध्यम आकारात कापलेला
१ गाजर अगदी बारीक चिरलेले
२ टेबलस्पून कोथिंबीर
मीठ चवीनुसार
१ टीस्पून तूप
½ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून मिरेपूड
१/४ टीस्पून जिरे पावडर
१/२ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून chilli flakes
स्टेप १: प्रथम हिरवी कच्ची मेथी पनीर सलाद बनविण्यासाठी एका पसरट पॅनमध्ये १ छोटा चमचा तूप टाकून त्यात पनिरच्या चौकोनी तुकड्यांना थोडे लालसर shallow fry करा.
स्टेप २: नंतर हिरवी मेथी , कांदा,गाजर ,कोथिंबीरीला बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्याच पॅन मधे पनीर, मेथी, कांदा, जिरे पूड, मिरे पूड मीठ, chilli flakes कोथिंबीर एकत्र करून चांगल्या प्रकारे मिक्स करून अर्धा मिनिट परतून घ्या.
स्टेप ३:पौष्टिक हिरवी कच्ची मेथी पनीर सलाद तयार आहे. ह्या सलादला जेवणासोबत किंवा हलक्या फुलक्या भुकेच्या वेळी सर्व्ह करा.







0 Comments