गाजराच्या किसाचे पौष्टिक फुलके
साहित्य :-
१ गाजराचा किस,
गाजराच्या किसात मावेल एवढे गव्हाचे पिठ
चविनुसार मिठ
पिठात टाकण्यासाठी १छोटा चमचा तूप आणि चपातीला वरून तूप लावण्यासाठी आवश्यकते नुसार
पाणी आवश्यकते नुसार
कृती:-
स्टेप १ - प्रथम गाजर स्वच्छ धुवुन घेणे.आणि साल काढणे. गाजराचा किस करून एका परातीत काढून घ्या त्यात १ छोटा चमचा तूप, मिठ चवीनुसार व मावेल एवढे पिठ टाकून, पाणी मिसळायचे असेल तर आवश्यतेनुसार पाणी टाकून मग कणिक सैलसर मळून घ्या. कणिक मळताना फार घट्ट किंवा फार पातळ मळू नये. पीठ मळून झाल्यानंतर तुपाचा हात लाऊन अर्धा तास झाकून बाजूला ठेवा म्हणजे आपल्या पोळ्या चांगल्या होतील.
स्टेप २ - गाजराचे फूलके :-आता कणकीचे छोटे छोटे गोळे बनवून मध्यम आकाराचे पातळ पोळी लाटावी.
स्टेप ३ - तवा गरम करून त्यावर लाटलेली पोळी दोन्ही बाजूने लाइट शेका आणि तवा गॅसवरून उतरवून चिमट्याच्या मदतीने सरळ गॅसवर पोळीला दोन्ही बाजूला शेका.ती फुगून मोठी होइल. हे झाले आपले गाजराचे पौष्टिक फूलके. गरमागरम फुलक्याला वरून तूप लावून भाजी सोबत सर्व करा.




0 Comments