मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक, रिफ्रेशिंग ड्रिंक:
#पौष्टिकआहाररेसिपी
#मिल्क
#मिल्कअंजीरबदामशेक
अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, कॅल्शियम, लोह, फास्फोरस, माग्नेशियम, सोडियम, पोट्याशियम, आणि क्लोरीन सारखे, तत्व असतात. अंजिरात तंतू जास्त प्रमाणात असतात. शोधणे असे माहीत झाले आहे कि, अंजिरात जास्त तंतू असल्यामुळे याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहावर गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात.
मिल्क अंजीर शेक एनर्जेटिक आणि रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. जे हेल्दी ,चविष्ट आणि आरोग्याला लाभदायक आहे. हे ड्रिंक उपवासाला सुद्धा चालते.
साहित्य :
2 ग्लास थंड दूध
6अंजीर
१० बदाम
३ टिस्पून साखर
कृती:
स्टेप १ - सगळ्यात पाहिले अंजिरला थोड्या पाण्यात 4 तासासाठी भिजवून ठेवा.
स्टेप २ - ४ तासानंतर भिजलेल्या अंजिराचे छोटे छोटे तुकडे करा.
स्टेप ३ - आता मिक्सरचा छोटा पॉट घ्या त्यात तुकडे केलेले अंजीर, बदाम ,साखर , विलायची आणि थोडे दुध घेऊन त्याची पेस्ट करा.
स्टेप ४ - आता त्या पेस्ट मध्ये उरलेले दूध घालून मिक्सरच्या मोठ्या जार मध्ये फिरवून मिक्स करून घ्या.
स्टेप ५ - घ्या मिल्क अंजीर, बदाम शेक एनर्जेटिक, रिफ्रेआशिंग ड्रिंक तयार आहे .
स्टेप ६ - थंड थंड मिल्क ,अंजीर, बदाम शेकचा आनंद घ्या.







0 Comments