खमंग जवसाची पौष्टिक चटणी एक फायदे अनेक:

#पौष्टिकआहाररेसिपी

जवस (  अलसी,फ्लॅक्स सीड ) हे मुख्यत्वे गळीत धान्य आहे. प्राचीन काळापासून भारतात जवसाची लागवड करण्यात येत आहे. काही वैदिक ग्रंथात जवसाच्या बिया, झाडाचे विविध उपयोग सांगितले आहेत. भारतात जवसाची मुख्य पिकात गणना होत नाही. मात्र सध्या जवसाच्या बियांतील विशेष घटकामुळे आहारशास्त्रात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पूर्वीपासून आपल्या आहारात जवसाची चटणी, तेलाचा ग्रामीण आहारात समावेश आहे. जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. .जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, 

रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीरच होईल.एवढे सर्व औषधी गुणधर्म असूनही जवस आजच्या आहारातून हद्दपार झाले आहे. पूर्वी खुरसणी, जवसाची चटणी घरोघरी बनवली जात होती. भाकरीबरोबर ही चटणी अगदी दररोज तोंडीलावणे म्हणून पानात वाढली जात होती. आता मात्र जवस फक्त मुखवासाच्या पॅकमध्येच दिसत आहे. जवसात अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे.  जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.

जवसाची  सहज-सोपी रेसिपी तुमच्या कुटुंबाला आणखी हेल्दी बनवतील यात शंका नाही.

 साहित्य:

2 कप जवस

१0-१2 लसून पाकळ्या

१ टी स्पून जिरे

१५  सुक्या लाल मिरच्या 

मीठ चवीने

कृती:

स्टेप १ - प्रथम जवसाचे बी निवडून घेवून एका कढई मध्ये मंद ५ मिनिटे विस्तवावर भाजून थंड करायला बाजूला ठेवा. जास्त भाजू नका. त्यानंतर लाल मिरच्या खमंग भाजून घ्या.लसून सोलून चिरून घ्या.


स्टेप २ - मिक्सरच्या भांड्यात भाजून थंड केलेले जवस, चिरलेला लसून, जिरे, लाल सुक्या मिरच्या व मीठ घालून बारीक वाटून घ्या.



स्टेप ३ - खमंग जवसाची चटणी भाकरी बरोबर ,चपाती किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.




Post a Comment

0 Comments