पृथ्वीवरील फोडणीचे चविष्ट, चरचरीत अमृतपेय ताक (बटर मिल्क):

#पौष्टिकआहाररेसिपी

#कीवर्ड#बटरमिल्क

#फोडणीचेताक

#फोडणीचेअमृतपेयताक

#बटरमिल्क

ताक शरीरासाठी उत्तम आहे आपल्याला माहीतच असेल. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात.क हा दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे.

दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते.

ताक प्यायल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. म्हणूनच जड जेवणासोबत ताक पिणे योग्य ठरते. अशा ताकात जिरेपूड, आलं आणि सैंधव मीठ असेल तर ताकाचा चांगला परिणाम शरीरावर लवकर होतो. चला तर आज आपण फोडणीच्या अमृतपेय ताकाचा आस्वाद घेऊयात.

साहित्य:

२ कप दही

२ कप पाणी 

१ टिस्पून तूप

१/२ टिस्पून मोहरी

१/२ टिस्पून जिरे

१/४ टिस्पून हिंग

२ लाल वाळलेल्या  मिरच्या कुस्करून घेणे

२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून

चवीपुरते मिठ

कृती:

स्टेप १ - प्रथम एका भांड्यात दही रवीने घोटून घ्यावे. मग पानी घालून पुन्हा एकदा घुसळून ताक बनवून घ्यावे. ताक घुसळताना थोडेफार लोणी निघते ते बाजूला काढून ठेवणे.




स्टेप २ - एका भांड्यात तूप गरम करून मोहरी घालावी ती तडतडली की जिरे, हींग व कढीपत्त्याची पाने , लाल कुस्करलेल्या मिरच्या व थोडीशी चिरलेली  कोथिंबीर घालून परतावी. अशी फोडणी तयार करून घ्यावी. 

 

स्टेप ३ - ताकामध्ये हि फोडणी घालून मिक्स करावे. चवीनुसार मिठ घालावे.




स्टेप ४ - हे ताक गरम केले नाही तरीही चालते. पण गार ताक प्यायचे नसेल तर अगदी मंद आचेवर किंचित कोमट करावे. सतत ढवळत राहावे .जास्त  गरम करू नये नाहीतर ताक फुटते. ताक गरम केले तर ते सतत ढवळत राहावे . ताक गरम ना करताही घेता येते.

स्टेप ५ - जेवताना हे ताक मधेमधे प्यायला तसेच मुग, तूर तांदुळाच्या खिचडी बरोबरही हे ताक छान लागते .सर्व्ह करताना वरुन थोडी बारीक़ चिरलेली  कोथिंबीर घालून दयावे.



Post a Comment

0 Comments