Jawas Bhakri Sandwich recipe in marathi -

 स्वादिष्ट जवस चटणी' कांदा,चीज भाकरी देशी सँडविच 



# jawas bhakri recipe 

# bhakri sandwich recipe

सँडविच हे एक लोकप्रिय खाद्य पदार्थ है, ह्याचा उपयोग नाश्ता, जेवण ,आणि छोट्याश्या पार्टीमध्ये स्टार्टर म्हणुन उपयोग केला जातो

सँडविच  तयार करताना नेहमी दोन किंवा ३ ब्रेड स्लाईस राहतात .सँडविच पॅकफूड च्या रुपात मिळते. सँडविचला ऑफिस ,स्कूल किंवा  पिकनिकला घेऊन जाऊ शकतो. सर्वसाधारण सँडविच मध्ये  सलाद वेजीटेबल्स, मांस, पनीर, सर्व प्रकारचे सॉस इत्यादी खाद्य घटकांचे संयोजन असते. 

ब्रेड सँडविच तर आपण बनवितोच ,पण आज आपण 

Healthy स्वादिष्ट जवस चटणी, कांदा ,चीज भाकरी सँडविच बनविणार आहोत. हे भाकरी सँडविच ब्रेकफास्ट ,जेवणासाठी उपयोगात आणू शकतो.हया सँडविचची चव खूप स्वादिष्ट लागते. 

जवस चटणी कांदा भाकरी सँडविच हे झटपट बनणारे आणि healthy आहे. ह्यात तुमच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या चटण्या सँडविचमध्ये टाकुन स्वाद वाढवू शकता.

साहित्य :

4 टेबलस्पून ज्वारीचे पिठ

८ टिस्पून जवस चटणी

४ टिस्पून जवस तेल किंवा जे तेल available असेल ते 

२ कांदे बारीक चिरलेले

२ चीझ स्लाईस

तिखट पाहिज पाहिजे असल्यास १ टिस्पूनलाल लाल मिरची पावडर

चवीनुसार मीठ

पाणी

कृती :

स्टेप १: प्रथम ८ टिस्पून जवस चटणी,  ४ टिस्पून जवस तेल किंवा जे तेल घरी वापरत असेल ते २ कांदे बारीक चिरलेले, २ चीझ स्लाईस,तिखट पाहिजे असल्यास १ टिस्पून लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ एकत्र मिक्स करा. (टिप--तसे जवस चटणीत लसूण , जिरे , लाल तिखट असते. पण अवश्यक्यता असल्यास तिखट मीठ  मिसळणे.) ज्वारीच्या पिठामध्ये 1/2 टीस्पून मीठ घालून मळून गोळा तयार करा . गोळा चांगला चुरून घ्या. नंतर गोळ्याच्या भाकऱ्या तयार करा आणि तव्यावर मऊसुत भाकऱ्या शेकून घ्या.




स्टेप २: नंतर एक भाकरी घ्या. भाकरीच्या अर्ध्या साईडला जवस आणि ,कांदा, आणि चीजचे मिश्रण भाकरीवर पसरून द्या आणि त्या जवस चटणीच्या मिश्रणावर अर्धी भाकरी दुमडून द्या.बाकी जवस चटणी कांदा भाकरी सँडविच  तसेच तयार करा.नंतर तव्यावर तेल सोडून त्यावर जवस चटणी कांदा भाकरी चीज सँडविच ठेवून दोन्ही साईड ने शेकून घ्या आणि गरमागरम स्वादिष्ट, healthy भाकरी सँडविच सर्व्ह करा.




Post a Comment

0 Comments