Stuffed veg potato masala dosa

 स्टफ्ड वेज पोटॅटो मसाला डोसा :

# crispy masala dosa recipe with potato filling

# stuffed potato masala dosa

स्टफ्ड वेज पोटॅटो मसाला डोसा बनवायला एकदम सहज सोपा, चवीला कुरकुरित ,स्वादिष्ट आणि दिसायला वेगळा.

साहित्य :

5 कप डोस्याचे बॅटर  

४ उकळलेले बटाटे

१ बारीक चिरलेला टोमॅटो

१ बारीक चिरलेला कांदा

4 बारीक कापलेल्या मिरच्या

१० पाने कडीपत्ता 

२ टिस्पून जिरे लसणाचे वाटण 

2 टेबलस्पून कोथिंबीर टिस्पून मोहरी,

१ टिस्पून जिरे

१/२ टिस्पून  हळद

१ टिस्पून धने पावडर

१/२ टिस्पून हिंग

तेल जरूरतीप्रमाणे

मीठ चवीनुसार

कृती :

स्टेप १: प्रथम बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे व हिंग फोडणीला घाला.मोहरी  जिरे तडतडले की त्यात जिरे लसणाचे वाटण,कांदा, हळद, हिरव्या मिरच्या, घालून परतून घ्या.आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी घाला, मीठ चवीनुसार घाला व मिक्स करून परतुन घ्यावे. नंतर कोथिंबीर घालून परतणे आणि बटाटयाच्या भाजीला (पोटॅटो मसाल्याला ) थंड करा.




स्टेप २
: बटाटयाची भाजी (पोटॅटो मसाला) थंड झाल्यावर तव्याला थोडेसे तेल लावून वर थोडे पाणी शिंपडावे म्हणजे डोसा चिकटणार नाही. गरम तव्यावर डोस्याचे थोडे  मिश्रण टाकून पसरवणे डोस्याला मंद आचेवर शेकून घ्या. त्याच डोस्यावर बटाटयाची भाजी (पोटॅटो मसाला) टाकून स्टफ्ड करून पसरवून घ्या. परत  बटाटयाची भाजीवर (पोटॅटो मसाल्यावर) डोस्याचे परत मिश्रण टाकून झाकुन पसरवणे आणि साईडने थोडे छोट्या चमच्याने तेल टाका . झाकण ठेवून 2 मिनीट शेकणे व परतवून घ्यावे.आता दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून  खरपूस  होईपर्यंत शेकणे.






स्टेप 3: तयार आहेत आपले स्टफ्ड वेज पोटॅटो मसाला डोसा दही किंवा साॕस सोबत गरमागरम खायला द्यावे.




Post a Comment

0 Comments