Pancake recipe

इन्स्टंट वरई तांदूळ (भगर) पोटैटो  स्टफ्ड उपवासाचा कुरकुरित, स्वादिष्ट पॅनकेक:-


# pancake recipe in marathi

पॅनकेक जगभरातील बर्‍याच संस्कृती मध्ये प्रसिद्ध डिश आहे, जी एक प्रकारची सपाट ब्रेड किंवा साधा केक आहे, जो गोड किंवा तिखट असतो . आपण भारतात डोसा, आणि महाराष्ट्रात धिरडे म्हणू शकतो.

पॅनकेक रेसिपीत पिठ, अंडी आणि दूध हे मूलभूत खाद्य पदार्थ असतात. अमेरिका आणि कॅनडासारख्या काही देशांमध्ये, पॅनकेक्स न्याहारी म्हणून दिले जातात, युरोपमध्ये इतर काही देशांमध्ये पॅनकेक्स रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून खातात,

(आकारानुसार, थोडेसे अधिक किंवा कमी) तयार करू शकता. आपण अतिथींच्या संख्येनुसार अन्नपदार्थांचे प्रमाण घेतात.

उपवासाचा पॅनकेक बनविण्यासाठी भगर, साबुदाणा, राजगिरा पीठाचे बैटर बनवावे लागते. हा पॅनकेक सोपा आणि इन्स्टंट होणारा आहे ह्यात भगर, साबुदाणा रात्री भिजवावा लागत नाही. हा पॅनकेक चवीमध्ये थोडा वेगळा आहे. स्वादिष्ट आहे. आहे आपण पॅनकेक मधे बटाट्याची चटनी स्टफ्ड करणार आहोत.

तर चला तर आज करूयात इन्स्टंट वरई तांदूळ (भगर ) पोटैटो स्टफ्ड उपवासाचा कुरकुरित, स्वादिष्ट पॅनकेक.

 ५ टेबलस्पून वरई तांदूळ (भगर)

२ टेबलस्पून साबूदाना

२ टेबलस्पून राजगिरा पीठ

४ हिरव्या मिरच्या

१टीस्पून मिरे पूड

चवीनुसार शेंदा मीठ

३ उकळलेले बटाटे

४ हिरव्या मिरच्या

चवीनुसार मीठ

२ टेबलस्पून मीडियम जाडसर शेंगदाण्याचा कूट

पाणी आवश्यकतेनुसार

१ टीस्पून तूप

५टेबलस्पून दही

कृती :

स्टेप १: प्रथम भगर व साबुदाणा मिक्सर मधे बारीक रवाळ वाटून घ्या. बारीक केलेली भगर व साबुदाणा, राजगिरा पीठ, दही आणि चिमूटभर खाण्याच्या सोडा, शेंदा मीठ पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्रित करा. मिश्रण जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको मिश्रण मीडियम घट्टसर भिजवा. मिश्रण ३०मिनिटें झाकण ठेवून बाजूला ठेवा.




स्टेप २: पॅन केक मधे सारण भरण्यासाठी बटाट्याच्या चटणीसाठी 3 बटाट्यांची साल काढून त्यांना बारीक कुस्कुरून घ्यावे. 4 हिरव्या मिरच्यांचे काप करून व मिरे पूड, शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालावे कढईत 1 टीस्पून्स तूप टाकून वरील मिश्रण मंद गॅसवर १मिनिट ठेऊन मिक्स करावे चांगले परतून काढावे. आपली बटाट्याचे चटनी तयार झाली.


स्टेप ३: आता तवा गरम करायला ठेवून मध्यम गरम झाल्यावर तेल टाकावे.व साधारण जाडसर मिश्रण पसरवावे व त्यावर बटाट्याचे चटनी ठेवावी आणि त्यावर परत मिश्रण टाकून पसरवणे. बटाट्याच्या चटनीला मिश्रणाने झाकणे.





स्टेप ४: साईडने थोडे तेल टाका झाकण ठेवुन शिजवा मिश्रण जाडसर असल्याने जाड झाकण ठेवून 2 मिनीट शिजवावे. व परतवून घ्यावे.आता दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून शिजवून घ्यावे.खरपूस होईपर्यंत शिजवा.

स्टेप ५: तयार आहे आपला  इन्स्टंट वरई तांदूळ (भगर) पोटैटो  स्टफ्ड उपवासाचा कुरकुरित, स्वादिष्ट पॅनकेक दह्यासोबत सोबत गरमागरम खायला सर्व करा.




Post a Comment

0 Comments